● 200 विद्यार्थ्यांच्या सहभागातून, उत्साहात संपन्न झाला राष्ट्रीय गणित दिन
22 डिसेंबर हा दिवस थोर गणितज्ञ रामानुजन यांच्या जन्मदिनी संपूर्ण देशात, राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये हा गणित दिवस दोनशे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागातून मोठ्या उत्साहात संपन्न झाला .
नरडवे हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा वसुंधरा विज्ञान केंद्राचे तज्ञ मार्गदर्शक श्री. के.एम. पठाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात कोरोना च्या कालावधीमध्ये गेली दोन वर्षे आलेली मरगळ ,विद्यार्थ्यांनी झटकून टाकली आणि शाळेमध्ये एक वेगळाच उत्साह ,नवचैतन्य निर्माण झाले .
या कार्यक्रमांमध्ये सन 2020-21 व 21- 22 या वर्षी आयोजित केलेल्या भौमितिक आकाश कंदील स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला .तसेच गणित संबोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी, गणित उत्सव रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, एम जी टी फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळालेले विद्यार्थी ,राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थिनी कुमारी प्रतीक्षा नीळकंठ मेस्त्री ,मार्गदर्शक शिक्षक श्री समीर चांदरकर इत्यादी स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा अभिनंदन सोहळा संपन्न झाला.
या गणित उत्सव कार्यक्रमात गणितीय परिपाठ, गणित गीत, अंकांच्या किमयेतून गणेश दर्शन, गणितज्ञांची माहिती, गणितीय कोडे, जादूचे प्रयोग ,चिन्हांकित संख्यांवरील क्रिया यावर आधारित गीत, कथा गणिताची-शून्यापासून अनंता पर्यंतच्या इतिहासाची, गणितीय उखाणे ,गणितीय चित्रकला स्पर्धा ,गणितीय रांगोळी प्रदर्शन असे विविध कार्यक्रम संपन्न झाले.
या कार्यक्रमास कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री सुनील नाईक,श्रीमती विजयश्री देसाई , स्कूल कमिटी चेअरमन सुधीर उर्फ बापू वराडकर, वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा चे मुख्याध्यापक श्री एन के कांबळे, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. शिरोडकर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.गणित शिक्षक श्री संजय नाईक, महेश भाट ,प्रकाश कानूरकर .सौ.वीणा शिरोडकर सौ.सिमरन चांदरकर ,श्री भूषण गावडे यांच्या कल्पक मार्गदर्शनातून व अथक परिश्रमातून हा सोहळा संपन्न झाला. श्री रामकृष्ण सावंत यांचे संगीत दिग्दर्शन व हार्मोनियम वरील साथ ,इयत्ता सातवी मधील विद्यार्थी कुमार हर्ष तांबट याची ढोलकीवर सुरेख साथ यामुळे कार्यक्रम मनोरंजक ठरला.कला शिक्षक समीर चांदरकर यांनी चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश कानूरकर यांनी तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी कादंबरी वालावलकर या विद्यार्थिनीने केले.
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर यांनी ,कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे ,मार्गदर्शक शिक्षकांचे दूरध्वनीद्वारे अभिनंदन करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
शाळेतील सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून आणि कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पाठबळातून संपन्न झालेला कार्यक्रम सर्वांना प्रेरणादायी ठरेल.