तुमच्या नावावर कुणाकुणाची सिमकार्ड ?


अवघ्या 30 सेकंदात समजणार तुमच्या नावावर किती सिम कार्ड ?

●सरकारच्या नव्या पोर्टलवर मिळणार सिमकार्डची माहिती !


● नेमकं काय घडलंय ?

TRAI अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानुसार, यापूर्वी एका आधारकार्डवर नऊ सिमकार्ड खरेदी करता येत होते. आता एका आधार कार्डवर 18 सिम कार्ड खरेदी करता येतात. बिजनेसमुळे ज्या लोकांना अधिक सिमकार्डची गरज आहे, अशा ग्राहकांना KYC करण्याची गरज आहे. 

 KYC करण्यासाठी 7 डिसेंबरला एक नोटिफिकेशन जारी करण्यात आले होते.  KYC करण्यासाठी ग्राहकांना 60 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय ग्राहक, आजारी आणि दिव्यांग  नागरिकांना अतिरिक्त 30 दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे.

● पण हे आत्ता का ?

तुमच्या नावावर एकूण किती सीम कार्ड आहेत?, तुमच्या नावावर भलत्याच  कुणी सिमकार्ड घेतलेलं नाही ना? याचं उत्तर आता तुम्हाला केवळ 30 सेकंदात कळणार आहे. सरकारच्या नव्या पोर्टलवर तुमच्या नावावर असलेल्या सिमकार्डची माहिती तात्काळ मिळणार आहे. tafcop.dgtelecom.gov.in   या वेबसाईटवर ही माहिती आपल्याला मिळू शकेल. तुमच्या नावावर दुसऱ्या कुणी सिमकार्ड घेतलं आणि त्याचा गैरवापर केला तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागू शकते. त्यामुळे या पोर्टलचा वापर करून तुमच्या नावावर कुणी सिमकार्ड वापरत नाही ना हे तपासता येणार आहे. 

जर तुमच्या ID वर असे सिम तुम्ही वापरत  नाही तर त्यांचा भुर्दंड तुम्हाला भरावा लागेल. जर तुमच्या ID वरुन रजिस्टर्ड सिम वरुन चुकीचे आणि बेकायदेशीर गोष्टी सुरू असतील तर तुमच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.