लगबग लहानग्यांच्या लसीकरणाची नोंदणीची !

मुलांच्या लसीकरणासाठी 'कोविन' अ‍ॅपवर नोंदणी
● 1 जानेवारीपासून सुरु होणार नोंदणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु करणार असल्याची घोषणा केली होती. त्यासाठी 1 जानेवारीपासून कोविन अ‍ॅपवर नोंदणी करावी लागणार असल्याची माहिती 'कोविन'चे प्रमुख डॉ. आर. एस. शर्मा यांनी दिली.

अनेक विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड व इतर ओळखपत्रे नसतील. त्यामुळे कोविन अ‍ॅपवर नोंदणी करताना मुलांचे दहावीचे ओळखपत्रही पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार असल्याचे डाॅ. शर्मा म्हणाले..

अ‍ॅपवर कशी नोंदणी करणार..?

◆प्रथम कोविन अ‍ॅपवर जाऊन तुमचा मोबाईल नंबर टाका. ओटीपी आल्यावर तो भरुन लॉग इन करा.
◆आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, व्होटर आयडी, युनिक डिसॅबिलिटी आयडी किंवा रेशन कार्ड पैकी कोणतेही एक पुरावा निवडा.
◆निवडलेल्या आयडीचा नंबर, नाव टाका. नंतर जेंडर नि जन्मतारीख टाका.
◆जवळच्या लसीकरण केंद्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येईल.
◆लसीकरणाची तारीख, वेळ आणि लस निवडा. केंद्रावर जाऊन लसीकरण करा.
◆लसीकरण केंद्रावर तुम्हाला संदर्भ आयडी आणि सिक्रेट कोड द्यावा लागेल. जे तुम्ही नोंदणी केल्यावर तुम्हाला मिळेल.
◆तुमच्या लॉगिनमध्ये इतर सदस्य जोडून त्यांच्या लसीकरणाची नोंदणी करू शकता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.