महिला पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक हे नाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सोशल मीडियातून आणि मराठी वृत्तवाहिन्यांमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलय. एरवी महाराष्ट्र पोलिसात व्हीआयपी मंडळीना एस्कॉर्ट किंवा पायलट करणारा हा चेहरा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्हीआयपी व्हेइकलला ड्राईव्ह करणारा ठरला आणि अचानक सिंधुदुर्ग पोलीसांची महाराष्ट्रात कौतुकाने चर्चा होतेय !
● नेमकं घडलं काय ?
उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोकण दौऱ्यावर आहेत. अजित पवार डीपीडीसी बैठकीसाठी आणि कोरोनाचा आढावा घेण्यासाठी सिंधुदुर्गमध्ये गेले आहेत. यावेळी अजित पवारांनी नारायण राणे यांचा त्यांच्या स्टाईलने समाचार घेतला. त्यांचा हा दौरा नारायण राणे यांना टोलेबाजी करण्यावरून तर चर्चेत राहिलाच मात्र अजित पवारांच्या या दौऱ्यात आणखी एक लक्षवेधी घटना घडली ती म्हणजे अजित पवारांच्या गाडीचे सारथ्य हे महिला चालकाने केल्याचे दिसून आले. मागे अजित पवार बसतले होते, त्यावेळे स्टेअरिंगवर एक महिला चालक दिसून आली. आणि मग चर्चा सुरु झाली ती महिला कॉन्स्टेबल नंबर 1253 ची
● संधीचे सोनं करणारा निर्णय
खाकी वर्दीतल्या या सेवेला वेगळं काही तरी करताना नेहमीच मर्यादा येतात..पण ज्यांना सिंधुदुर्ग पोलिसांचा कर्तव्यतत्परपणा हा शब्द चांगलाच ठाऊक आहे. सिंधुदुर्ग पोलीस खाते हे शिस्तीला करडे, आणि समाजमनात संवेदनशील अशी प्रतिमा निर्माण करण्यात आणि जपण्यात नेहमीच प्रयत्नशील असतात.
महिला पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक ह्या मूळ कोल्हापूरच्या. आई वडिलांच्या प्रेरणेने त्यांनी महाराष्ट्र पोलीस खाते जॉईन करण्याचा निर्णय केला. बीएची पदवी घेऊन 2011 मध्ये तृप्ती मुळीक ह्या महाराष्ट्र पोलीस सेवेत जॉईन झाल्या. त्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये मोटार परिवहन विभागात रुजू झाल्या. यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या व्हीआयपीना एस्कॉर्ट किंवा पायलट करण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पडलीय.
पुढे काहीतरी वेगळे करण्याच्या दृष्टीने मुळीक यांनी व्हीआयपी सिक्युरिटी आणि ड्राईव्ह कोर्समध्ये स्वतःला सिद्ध करायचे ठरवले. डिसेंबर महिन्यात झालेला हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करुन 25 तारखेला तृप्ती मुळीक ह्या पुन्हा मोटार परिवहन विभागात सेवेला रुजू झाल्या.. आणि 26 डिसेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे सारथ्य करत आज संपुर्ण सिंधुदुर्ग पोलिसांना अभिमान वाटेल अशी दिमाखदार कामगिरी केलीय.
● आणि आठवला पवार साहेबांचा निर्णय
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी त्यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती मुळीक या पोलिस दलातील महिला चालकाने केले. महिलांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करून त्यांच्या सक्षमीकरणाचा लोकनेते शरद पवार यांचा वारसा उपमुख्यमंत्री अजित पवार हे समर्थपणे पुढे नेत असल्याचे यातून दिसून येते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनाचे सारथ्य करणाऱ्या भगिनीला सिंधुदुर्ग 360° चा सलाम.