वेंगुर्ला पुन्हा देशात अव्वल !

 ● वेंगुर्ला काजू केंद्रांचा राष्ट्रीय सन्मान

● राष्ट्रीय पातळीवरचा प्रथम क्रमांकाचा सन्मान 

● 2016, 2017 नंतर 2021 मध्येही वेंगुर्ला केंद्र सन्मानित 



वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या काजू संशोधन केंद्राने 'उत्कृष्ट संशोधनात्मक विस्तार कार्य' केल्याने या काजू संशोधन केंद्रास 'उत्कृष्ट काजू संशोधन केंद्र' म्हणून यावर्षीचा 'राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार' मिळाला आहे. यावर्षीची अखिल भारतीय समन्वित काजू संशोधन प्रकल्पाची सभा नुकतीच दिल्ली येथे पार पडली. या सभेमध्ये 'प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले अंतर्गत अखिल भारतीय समन्वित काजू संशोधन प्रकल्प वेंगुर्ले' या प्रकल्पास 'देशातील उत्कृष्ट काजू संशोधन केंद्र' म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रादेशिक फळ संशोधन केंद्र अंतर्गत काजू संशोधन केंद्रास हा बहुमान तिसऱ्यांदा मिळालेला आहे.  यापूर्वी हा बहुमान प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले यांना 2016 साली आणि 2017 सालीदेखील मिळालेला आहे.

सन्मान राष्ट्रीय पातळीवरचा

राष्ट्रीय स्तरावरील अखिल भारतीय समन्वित काजू संशोधन प्रकल्पाची वार्षिक सभा ऑनलाईन घेण्यात आली. या सभेमध्ये देशातील विविध काजू संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ संशोधनाचे निष्कर्ष प्रस्तुत करतात. ज्या काजू संशोधन केंद्राने उत्कृष्ट संशोधनात्मक विस्तार कार्य आणि इतर तत्सम असे काम केले आहे, अशा काजू संशोधन केंद्रास उत्कृष्ट काजू संशोधन केंद्र म्हणून गौरविण्यात येते.


वेंगुर्ल्याचा काजू आफ्रिकेपेक्षा भारी

प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले अंतर्गत काजू संशोधन केंद्राने वेंगुर्ले येथील काजूच्या सुधारित जाती आणि आफ्रिकन देशातील काजू यांचे 'फायटोकेमिकल्स' पृथ्थकरण करण्यात आले. या पृथ्थकरणातील घटकावरून या संशोधन केंद्रावरील काजू जातीची प्रतवारी तसेच गुणवत्ताही आफ्रिकन देशातील काजू पेक्षा उत्कृष्ट असल्याचं आढळून आलं आहे. याचा फायदासुद्धा काजू बागायतदारांना तसेच प्रक्रिया उद्योगांना होणार आहे. या संशोधन केंद्रावर नियमित काजू कलमांना देशभरात मोठी मागणी असते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.