निवडणूकांची तारीख ठरली

ओबीसींच्या रद्द झालेल्या जागांवर 18 जानेवारीला खुल्या प्रवर्गातून निवडणूक

राज्यातील 106 नगरपंचायती व 2 जिल्हा परिषदांच्या स्थगित केलेल्या जागांवर आता 18 जानेवारीला मतदान होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याने या जागांवर खुल्या प्रवर्गातून उमेदवारांना संधी मिळणार आहे..

दरम्यान, उर्वरित जागांसाठी नियोजनाप्रमाणे 21 डिसेंबर रोजी मतदान होईल; परंतु मतमोजणी एकाच दिवशी 19 जानेवारी 2022 रोजी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

राज्यात 21 डिसेंबरला 106 नगरपंचायती, 2 जिल्हा परिषद भंडारा, गोंदिया, 15 पंचायत समित्या, 4000 हून अधिक ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होत आहेत. या निवडणुकीत ओबीसी आरक्षणातील राखीव जागांसाठी 7 दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची सूचना कोर्टाने निवडणूक आयोगाला दिली होती.

सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली. तसेच, नगरपंचायतींच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोर्टाचा आदेश आल्याने ही प्रक्रियाच चुकीची ठरत असल्याचे मत राजकीय पक्षांनी मांडले होते.

राज्यातील या निवडणूका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने या निवडणूका पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.