आता घराचा क्रमांक बनणार डिजीटल कोड

प्रत्येक घराला मिळणार युनिक कोड
● घरचा युनिक कोड बनणार डिजीटल पत्ता
● केंद्र सरकारची तयारी सुरु


आधार कार्डमुळे प्रत्येक व्यक्तीला विशिष्ट ओळख मिळाली.. त्याच धर्तीवर केंद्र सरकार लवकरच देशातील प्रत्येक घराला युनिक नंबर देणार आहे.. हा युनिक कोड म्हणजेच त्या घराचा पत्ता असेल.. त्यामुळे आता पूर्ण पत्त्याचा पुरावा देण्याची गरज भासणार नाही..

 देशातील प्रत्येक गाव, शहरातील प्रत्येक सोसायटीतील घरासाठी डिजिटल कोड दिला जाणार आहे.  हा डिजिटल कोड आल्यास पिन कोडची गरज उरणार नसल्याचे सांगण्यात येते.. केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या पोस्ट विभागाने याबाबत सूचना मागवल्या होत्या.

 देशात अंदाजे सुमारे 35 कोटी घरे आहेत. तसेच व्यावसायिक आणि इतर आस्थापनांसह सुमारे 75 कोटी इमारती असण्याची शक्यता आहे. या सर्वांसाठी 12 अंकी आयडी तयार करण्याचे आव्हान पोस्ट विभागासमोर असणार आहे.

घराच्या युनिक कोडचे फायदे

▪️ प्रत्येक घराचा पत्ता ऑनलाईन पडताळता येणार.
▪️ कोणत्याही कामासाठी पत्त्याच्या पुराव्याची गरज भासणार नाही.
▪️ नवीन प्रणालीमध्ये प्रत्येक घराला वेगळा कोड मिळेल.
▪️ सोसायटीतील प्रत्येक फ्लॅटला विशिष्ट कोड असेल.. 
▪️ दोन कुटुंबे एकाच मजल्यावर राहत असल्यास त्यांना भिन्न कोड मिळेल.
▪️ केवायसीसाठी बँक, विमा कार्यालय किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही. डिजिटल पद्धतीने केवायसी करता येणार.
▪️ ऑनलाईन सुविधांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
▪️ उपग्रहांना प्रत्येक इमारतीचे अचूक स्थान सांगता येईल.
▪️ खोटा पत्ता देणाऱ्यांचाही पर्दाफाश करता येणार आहे..

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.