सायबर फ्रॉडपासून वाचवा तुमचे बँक अकाऊंट

सध्या ऑनलाइन बॅंकिंगकडे लोकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे.. ऑनलाईन व्यवहाराचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही..! त्यामुळे डिजिटली व्यवहार करताना सतत दक्ष असणे आवश्यक असते..

सायबर चाेरांची अशा लोकांवर नजर असते. कधी केवायसीच्या नावाखाली, कधी नोकरीची ऑफर देऊन, तर कधी खाते ब्लॉक करण्याची धमकी देऊन हे भामटे तुमच्या खात्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात.. ऑनलाईन व्यवहार करताना काय काळजी घ्यायला हवी, याबाबत जाणून घेऊ या...


● पिन / ओटीपी शेअर करू नका

तुमची बँक किंवा इतर कोणतीही संस्था कधीही कोणतीही गोपनीय माहिती विचारत नाही. त्यामुळे कधीही कोणाशीही तुमचा पिन किंवा ओटीपी शेअर करु नका. तुमच्या खात्यात पैसे टाकण्यासाठी कधीही पिन किंवा ओटीपीची गरज लागत नाही.

अज्ञात लिंकवर क्लिक करू नका

कधीही न पाहिलेल्या ऑफरचे आमिष दाखवून लूटले जाते. त्यामुळे असे आमिष दाखविणाऱ्या लिंक्सवर क्लिक करु नका, अन्यथा तुम्हाला फिशिंग वेबसाइट्सकडे नेले जाते, जेथे फसवणूक होण्याचा धोका असतो.

बनावट कस्टमर केअर नंबरपासून सावध राहा 

काही फसव्या वेबसाईटवर ग्राहकांना चुकीचे कस्टमर केअर नंबर दिलेले असतात. तुम्ही फोन केल्यास बँक / विमा कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीशी बोलत असल्यासारखे बोलतात..त्याला बळी पडून अनेकदा आपण गोपनीय माहिती सांगून टाकतो नि गंडवले जातो..

अज्ञात पोर्टलवर पेमेंट करू नका

ग्राहकांची फसवणूक करणारे अनेक बनावट पोर्टल जॉब सुरु आहेत.. अशा पोर्टलपासून सावध राहा. त्यावरुन कधीही पेमेंट करु नका. अशा प्लॅटफॉर्मवर तुमची सुरक्षित ओळखपत्रे शेअर करणे टाळा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.