● पत्नीला मिळणार दरमहा 45 हजार रुपयांची पेन्शन
●मोदी सरकारची गृहिणींसाठी खास योजना..!
मोदी सरकारने आता गृहिणींसाठी खास योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून या महिला भविष्यात आर्थिकदृष्ट्या अधिक आत्मनिर्भर होऊ शकतील.. या योजनेचे नाव आहे, राष्ट्रीय पेन्शन योजना.! अर्थात ‘एनपीएस’ योजना..!
मोदी सरकारने घरातील गृहिणींसाठी ही विशेष योजना सुरु केली आहे. ही एक प्रकारे गुंतवणूक योजनाच आहे. मात्र, त्याद्वारे आयुष्याच्या उतार वयात तुमच्या पत्नीच्या नावे पेन्शन मिळू शकते. पत्नीचे भविष्य सुरक्षित होऊ शकते..
● समजून घ्या एनपीएसमधील गुंतवणूक
‘एनपीएस’ योजनेत 18 ते 65 वर्षे वयोगटातील कोणीही भारतीय खाते सुरू करू शकतो. एका व्यक्तीला एकच खाते सुरू करता येते. त्यात संयुक्त खाते असू शकत नाही..
योजनेतील गुंतवणुकीवर किती टक्के परतावा मिळेल, हे मात्र निश्चित नाही. आतापर्यंत मिळालेला परतावा पाहिल्यास, गुंतवणुकदारांना जवळपास 10 ते 11 टक्के परतावा मिळू शकतो.
● एनपीएसमध्ये कशी कराल गुंतवणूक ?
‘एनपीएस’ (NPS) योजनेत दरमहा किंवा वार्षिक पैसे जमा करता येतात. या योजनेत पत्नीच्या नावे खाते सुरु करुन दरमहा त्यात एक हजार रुपयांचीही गुंतवणूक करु शकता.. या योजनेतील खाते 60 व्या वर्षी मॅच्युअर होते. मात्र, तुम्ही पत्नीच्या 65 व्या वर्षांपर्यंतही खाते सुरू ठेवू शकता.
● जाणून घ्या एनपीएस मधले दोन प्रकार
एनपीएस’ योजनेत ‘टीयर-1’ नि ‘टीयर-2’ अशी दोन प्रकारचे खाती आहेत. त्यात ‘टीयर-1’मधील खात्यात पैसे गुंतवल्यास मुदतीपूर्वी काढता येत नाहीत. मुदत संपल्यानंतरच हे पैसे काढू शकता.
‘टीयर-2’ खाते सुरू करण्यासाठी ‘टीयर-1’मध्ये खाते असायला हवं. त्यात इच्छेनुसार पैसे जमा करू शकता अथवा रक्कम काढू शकता