वेध महाराष्ट्रातल्या औद्योगिक क्रांतीचा

● महाराष्ट्रात 3 लाख 30 हजार कोटींचे औद्योगिक करार – उद्योगमंत्री सुभाष देसाई

40 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन प्रगती मैदान येथे करण्यात आले आहे. या मेळ्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यवस्थापकीय संचालक प्रवीण दराडे यांच्यासह महाराष्ट्र लघु विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यात मागील दोन वर्षात 3 लाख 30 हजार कोटींचे औद्योगिक करार झाले असून गुंतवणूकदांरानी राज्याला प्रथम पसंती दर्शविली असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्र दालनाच्या उदघाटना प्रसंगी दिली.

 मागील दोन वर्षात 2019-20 आणि 2020-21 या महामारीच्या कठीण काळातही राज्यात मोठी गुंतवणूक झाली आहे. जवळपास 3 लाख 30 हजार कोटी रूपयांचे औद्योगिक करार झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या माध्यमाने राज्यात चांगल्या पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार असून याचा लाभ महाराष्ट्रातील नागरिकांना होईल. महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकीकरणात नेहमीच पुढारलेले राज्य राहिले असल्याचा उल्लेख करीत, या औद्योगिक विकासाची घोडदौडची प्रगती मैदानाच्या महाराष्ट्र दालनातही दिसत असल्याचे मंत्री देसाई यावेळी म्हणाले.


महाराष्ट्राचे दालन कलात्मक आहे. दालन पाहिल्यानंतर त्यात महाराष्ट्र राज्याची छाप दिसते. संपूर्ण मेळ्यात महाराष्ट्राचे दालन आकर्षणाचे केंद्र दिसत आहे. राज्याची औद्योगिक प्रगती तसेच राज्यातील लघु उद्योग एकाच ठिकाणी मांडण्यात आले आहेत. इलेक्ट्रिकल वॅहिकेल उभे केले आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीचा आरसा हे दालन असल्याचे उद्योग मंत्री म्हणाले.


“आत्मनिर्भर” ही संकल्पना मांडताना यंदा उद्योग क्षेत्रातील राज्याची भरारी तसेच डिजिटल, ई-तंत्रज्ञान क्षेत्रातील विकास, निर्यात, लघुउद्योग, स्टॉर्टअपला चालना देणारे धोरण, आदी सर्वच विषयांना स्पर्श करणारे आकर्षक प्रदर्शन यंदा मांडण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाचे तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाअंतर्गत येणारे 13 स्टॉल्स आहेत. बचत गटांचे 8 स्टॉल्स, कारागिरांचे 7 स्टॉल्स, सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रमांतर्गत येणारे उद्योग समूह (क्लस्टर) चे 8 स्टॉल्स आणि स्टॉर्टअप चे 6 स्टॉल्स उभारलेले गेले आहेत.

ही प्रदर्शन 19 नोव्हेंबरपर्यंत व्यापारी वर्गासाठी प्रवेश असणार आहे तर 20 ते 27 नोव्हेंबरपर्यंत सामान्यांसाठी प्रवेश असणार आहे. या प्रदर्शनाला प्रवेश शुल्क असून मेट्रो 65 स्थानकांवर सशुल्क प्रवेशिका उपलब्ध असेल. प्रगती मैदानच्या नवीन बांधण्यात आलेल्या इमारतीत, क्रमांक दोनच्या हॉलमध्ये महाराष्ट्र दालन आहे. महाराष्ट्र दालनाला जास्तीत जास्त लोकांनी भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र लघु विकास महामंडळाच्या पदाधिकाऱ्‍यांनी केलेले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.