खारेपाटणचे श्री देव कालभैरव मंदिर


आज कालभैरव जयंती..खरतर देव्हाऱ्यात नसणारे पण प्रत्येक देहाला सांभाळणारे हे अगम्य आणि गूढ दैवत. पूर्वी कालभैरव म्हंटलं की एक अनामिक भीती वाटायची पण देऊळ बंद सिनेमा आला आणि शंकर महादेवनच्या आवाजातील ते 'कालभैरव स्तोत्र' ऐकलं आणि सगळी भीती दूर झाली .. ते गाणे आणि स्तोत्र ऐकलं की अनामिक ऊर्जा अंगात भरून येते. पहिल्या ओळीपासून ऊर्जा देणारे गाणंच सांगते की हे दैवत केवळ जागृत नाही तर तुम्हाला चैतन्यदायी बनवते..


देवराज्य_सेव्यमान_पावनाघ्रिपंकजम्
व्यालयज्ञ_सूत्रमिंदू_शेखरं कृपाकरम्|
नारदादि_योगिवृंद वंदितं दिगंबरम्
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|
भानुकोटिभास्करं भवाब्दितारकं परं
नीलकण्ठमीप्सिथार्थ_दायकं त्रिलोचनम|
कालकाल_मम्बुजाक्षमक्ष_शूलमक्षरं
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|
शूलटंक_पाशदण्ड_पाणिमादिकारणं
श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम|
भीमविक्रम प्रभुं विचित्र तांडवप्रियं
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|
भुक्तिमुक्ति_दायकं प्रशस्तलोकविग्रहं
भक्तवस्तलं स्थितं समस्तलोकविग्रहं|
विनिकण्वन्मनोज्ञ्_हेम्_किंकिणीलस्तकटिं
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|
धर्मसेतू_पालकं* *त्वधर्ममार्ग्_नाशकम्
कर्मपाशमोचकम् सुशर्मदारकम् विभुम्|
स्वर्णवर्ण_शेष्_पाश_शोभितांगमण्डलं
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|
रत्नपादुकाप्रभाभिराम_पाद_युग्मकम्
नित्यमद्वितीयमिष्ट दैवतं निरंजनम्|
मृत्यु दर्प नाशनं करालदंष्ट्र मोक्षणम्
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|
अट्टहास_भिन्नपद्म_जाण्ड्_कोश_संततिं
दृष्टिपात_नष्टपाप_जालमुग्र_शासनं
अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|
भूतसंघनायकं विशालकिर्तीदायकं
काशिवास_लोकपुण्यपापशोधकं विभुम्|
नितिमार्गकोविदम् पुरातनम् जगत्पतिं
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|
कालभैरवाष्टकम् पठन्ति ये मनोहरं
ज्ञानमुक्ति साधनम् विचित्रपुण्यवर्धनम्|
शोक_मोह्_दैन्य_लोभ_कोपताप्_नाशनम्
प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधिम् नरा धृवम्
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे !

मी हे स्तोत्र मुद्दाम लिहिलंय.. तुमच्यापैकी प्रत्येकजण ते अगदी शंकर महादेवनच्याच चालीत वाचेल म्हणेल याची 200 टक्के खात्री आहे. पण थोडं काळभैरवबद्दल पण जाणून घेवूया..

श्री कालभैरव हे महादेवांचेच रुद्रावतार असुन हे मुख्य क्षेत्रपाल दैवत आहे.आठ दिशांना मुख्य मुख्य आठ आठ क्षेत्र रक्षक भैरव देवता असुन या आठी आठी चौसष्ट भैरवांचे मुख्य अधिनायक दैवत म्हणजेच श्रीकालभैरवनाथ हे आहे. श्रीकालभैरवनाथांची मनोभावे सेवा केल्याने साधकांस त्यांचे पूर्ण संरक्षण लाभते.
श्रीकालभैरवनाथ हे न्यायप्रिय दैवत असुन यांना खोटेपणा चालत नाही, हे मुख्य कोतवाल दैवत आहे.श्रीकालभैरवनाथांची खोटेपणाच्या कामासाठी कुणी सेवा उपासना केल्यास ते उलट त्यांनाच दंड करतात व सत्याच्या पाठीशी होऊन त्यांचे सर्वतोपरी संरक्षण करतात. श्रीकालभैरवनाथांच्या सेवेत त्यांना विशेष शुद्धजलधारांचा रुद्रभिषेक अतिप्रिय आहे. श्रीकालभैरवनाथांना बाजरीची भाकरी, लाल लसणाची चटनी, काद्याची पात टाकून केलेले वांग्याचे भरीत, पूराणावरणाचा नैवेद्य अतिप्रिय आहे.धर्मपुराणा पासून चालत आलेली ही माहिती आज फक्त फॉरवर्ड करतो पण ती वाचणे गरजेचे आहे ना !


आज या देवाबद्दल लिहीत असताना मला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका मंदिराबद्दल आवर्जून लिहायचे आणि सांगायचे आहे.. खारेपाटणचे कालभैरव मंदिर संपूर्ण कोकणातील नवीन वास्तूशैलीचा एक अजोड अनुभव आहे. बदलत्या काळाबरोबर आपण श्रीमंत होताना धार्मिक वैभव पण तेवढंच दिमाखात जपलं पाहिजे.. मला टेरवच्या भवानी माता मंदिरानंतर या मंदिराचे अप्रूप आहे.. कारण ग्रामस्थानी स्वहिमतीने बांधलेले मंदिर म्हणजे भव्य प्रासाद आहे..७२ तिठा आणि ७२ खेड्यांचा अधिपती अशी ओळख असलेले हे खारेपाटण मधील देव कालभैरव देवस्थान.. सभोवतालची हिरवाई  आणि त्यातील हे मंदिर अत्यंत प्रेक्षणीय आहे..

एकदा नक्की जा.. ७२ तिठा आणि ७२ खेड्यांचा अधिपती  असणाऱ्या या दैवताला मनोभावे वंदन कराल ना तेव्हा कदाचित तुमचाही अधिपती बनून जाईल. तुमच्यातल्या राघव शास्त्रीला हरवलेलं पुन्हा मिळून द्यायला, देव आपल्या सोबत असतो याची जाणीव करून द्यायला !!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.