परमपुज्यांचा परमसोहळा

● परमपूज्य भालचंद्र महाराज यांचा 44 वा पुण्यतिथी उत्सव

● 6 ते 10 डिसेंबरला निनादणार पुन्हा कनकनगरी

● नमो भालचंद्राच्या जयघोषासाठी आतुरली कणकवली


परमहंस भालचंद्र महाराज यांचा 44 वा पुण्यतिथी महोत्सव सोमवार दि. 6 ते 10 डिसेंबर 2019 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यात 10 डिसेंबर या पुण्यतिथी दिनी इतर कार्यक्रमांसोबतच सायं. 5 वा.  प.पू. भालचंद्र महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. 

असं असेल पुण्यतिथी सोहळ्याचे नियोजन

6 डिसेंबर ते 9 डिसेंबर या कलावधीत दररोज पहाटे 5.30 वा. समाधीपूजन, काकड आरती, स. 8.3 वा. सर्व भक्त कल्याणार्थ धार्मिक विधी, परमपूज्य भालचंद्र महाराज रुद्राभिषेक अनुष्ठान,  दु. 12.30 आरती, तीर्थप्रसाद व खिचडीप्रसाद, दु. 1 ते 4 भजने, सायं. 4 वा. किर्तन महोत्सव रात्री 8 वा. बाबंची दैनंदिन आरती अशा कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

● पुण्यतिथीदिनाचा पूजनसोहळा

दि. 10 डिसेंबर या प.पू. भालचंद्र महाराज यांच्या 44 व्या पुण्यतिथीदिनी पहाटे 5.30 वा. समाधीपूजन, काकड आरती, जपानुष्ठान, सकाळी 8 वा. भजने, 
सकाळी 10.30 वा. समाधीस्थानी श्रींची राजोपचार महापूजा, दु. 12.30  आरती, तीर्थप्रसाद व खिचडीप्रसाद, दु. 1 वा. भजने, सायं. 5 वा. संस्थान परिसरात परमहंस भालचंद्र महाराज यांची पालखी मिरवणूक, रात्री 8 वा. दैनंदिन आरती होणार आहे.

किर्तन सोहळ्याचे आयोजन

पुण्यतिथी महोत्सवानिमित्त किर्तन महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.  दि. 6 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत रोज सायं. 4.30 ते 7 यावेळेत दररोज होणार आहे. यात दि. 6 रोजी ह.भ.प.  महेश काणे यांचे 'संत गोरा कुंभार', दि. 7 रोजी ह. भ. प. चारूदत्त आफळे यांचे 'संत नामदेव महाराज चरित्र', दि. 8 रोजी ह. भ. प. सौ. संजोत केतकर यांचे 'कान्होपात्रा' तर दि. 9 ह. भ. प. कैलास खरे यांचे 'समर्थ रामदास स्वामी' यांच्यावर किर्तन होणार आहे. कोरोनासंदर्भात सर्व नियम पाळून हे कार्यक्रम होणार असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या अध्यक्षांकडून करण्यात आले आहे.

@sindhudurg360°

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.