मैत्रेय आणि पॅनकार्ड संदर्भात ठाकरे सरकारचे मोठे पाऊल

फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा देण्यासाठी #मैत्रेय आणि #पॅनकार्ड क्लब या कंपन्यांच्या मालमत्ता न्यायालयाच्या निर्णयानंतर तातडीने लिलावात काढण्याच्या प्रक्रियेला गती द्या, असे निर्देश गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीस तीस वर्षांपूर्वी अशा वित्तीय कंपन्यानी धुमाकूळ माजवला होता. त्यात अनेक भाबड्या गुंतवणूकदारांनी दामदुप्पट पैसे मिळण्याच्या आशेने काही रक्कम गुंतवली होती. मात्र गुंतवणूकदारांची वाढती संख्या आणि या कंपन्याबद्दल निर्माण झालेले संशयाचे वादळ यामुळे या कंपन्या बुडीत निघण्याची भीती निर्माण झाली होती. त्याच वेळी जिल्ह्यातील सर्व कार्यालय ही हलवली गेल्याने आणि एजंटना वित्तीय माहीती पुरवणे कंपनीकडून बंद झाल्याने खळबळ माजली होती.

'पॅनकार्ड क्लब लिमिटेड' विरोधात सिंधुदुर्ग, अमरावती, सातारा, नाशिक, नवी मुंबई, नागपूर येथे गुन्हे दाखल आहेत. कंपनीवर सुमारे ५१ लाख गुंतवणुकदारांच्या फसवणुकीचा आरोप आहे. तर मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीविरूद्ध महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. 'मैत्रेय' कंपनीवर राज्यातील लाखो गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. 'मैत्रेय' प्रकरणात एक जण फरार आहे तर एक जण तुरुंगात आहे.

मात्र आता तीस वर्षांनंतर पुन्हा ठाकरे सरकारने याप्रकरणी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतलाय. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या संदर्भात एक बैठक बोलावली होती . यामध्ये मैत्रेय आणि पॅनकार्ड या कंपन्या संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलाय. फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा देण्यासाठी मैत्रेय आणि पॅनकार्ड क्लब या कंपन्यांच्या मालमत्ता न्यायालयाच्या निर्णयानंतर तातडीने लिलावात काढण्याच्या प्रक्रियेला गती द्या, असे निर्देश गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत.

आर्थिक गुन्हे शाखेने 'पॅनकार्ड क्लब लिमिटेड' आणि 'मैत्रेय' या दोन कंपन्यांच्या प्रकरणात नियमानुसार पुढील प्रक्रिया करुन मालमत्ता लिलावात काढावी आणि संबंधित गुंतवणुकदारांना दिलासा द्यावा; असे निर्देश गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.