ओमिक्रॉन संकट: राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉनपासून मुंबई आणि महाराष्ट्रापासून दूर ठेवण्यासाठी आता राज्य  सरकारने देखील निर्बंध लागू केले आहेत. 

● राज्य सरकारची नवी नियमावली

राज्य सरकारने कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या  पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.  यासंदर्भात राज्य सरकारने नवे निर्बंध आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. 

राज्यात आता लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच सार्वजनिक वाहतूकीतून प्रवास करण्यास परवानगी असणार आहे. आता लसीकरणाशिवाय तुम्हाला सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार नाहीये


◆ कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्थळावरून म्हणजेच परदेशातून राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांनी भारत सरकारच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. 

देशांतर्गत प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर किंवा 72 तासांचा वैध RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट असल्यासच त्यांना राज्यात प्रवेश दिला जाणार आहे.

महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार अशी कोणतीही व्यक्ती टॅक्सी/खासगी वाहतूक चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये आढळून आल्यास त्याला 500 रुपये दंड, तर ड्रायव्हर/हेल्पर/कंडक्टरकडूनही 500 रुपयांचा दंड आकारला जाईल. बसेसच्या बाबतीत वाहतूक एजन्सीच्या मालकास 1000 रुपये दंड आकारला जाईल.


दोन्ही डोस पूर्ण झालेल्यानाच रेल्वे प्रमाणेच बससेवा, रिक्षाने प्रवास करण्याची मुभा असणार आहे. नियमांचं भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

◆  रिक्षा आणि टॅक्सीत विनामास्क आढळल्यास प्रवाशासह ड्रायव्हरलाही 500 रुपये दंड द्यावा लागेल. 

◆ दुकानात ग्राहक विनामास्क सापडल्यास 500 रुपये दंड द्यावा लागेल. तर दुकान मालकाला 10 हजार दंड द्यावा लागेल. 

मॉलमध्ये ग्राहकाने मास्क न घातल्यास त्याचा भुर्दंड हा मालकाला सोसावा लागणार आहे. मालकाला थेट 50 हजार रुपये द्यावे लागतील.


◆ राजकीय कार्यक्रमांनाही निर्बंध लावण्यात आले आहेत. कार्यक्रम आणि सभांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्यास आयोजकांवर 50 हजार रुपये दंड आकारला जाईल. तर कार्यक्रम सुरु ठेवायचा की तिथेच बंद करायचा याचे अधिकार हे स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.