२८ नोव्हेंबर रोजी सुवर्णकोकणची कार्यशाळा

 ● तब्बल दोन वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा कार्यशाळेचे आयोजन

● 28 नोव्हेंबर रोजी मुंबईत विशेष प्रशिक्षण कार्यशाळा

● बंदिस्त शेळीपालन आणि व्यावसायिक कुक्कुटपालनच्या श्रीमंतीचा उलगडणार मंत्र


दोन वर्षे कोरोना काळात अर्थव्यवस्था ठप्प होती. पण सुवर्ण कोकण अविरत सुरू होते.. कारण तो एक विचार होता.. गावखेड्यानी शहराला दिलेला आणि शहरांनी पुन्हा गावाला श्रीमंत बनवलेला.. लॉकडाऊन मुळे अनेक मोठमोठाले व्यवसाय ठप्प झाले, पण आम्ही थांबलो नाही...कारण गावगाडा सुरूच होता. गावगाडा म्हणजे खरे जगणे, आणि खरी अर्थव्यवस्था.. कोरोना काळातल्या उद्योग कसा टिकवावा या चिंतेत जग असताना सुवर्ण कोकणने खिशात पैसा नसताना, घराबाहेर न पडताना उघडणारे पैशाच्या दाराची कवाडे मोकळी करून दिली.. हा चमत्कार नव्हता तर मातीवर आणि धमन्यावर विश्वास असणाऱ्या नव्या उद्योजकांची श्रीमंत गाथा होती. 

आता हळूहळू निर्बंध मिटतायत, पुन्हा सगळे सावरतय.. ठप्प असताना आम्ही चालत होतो, आता जग चालायला लागल्यावर आपण उडण्याची स्वप्ने पाहिली पाहिजे. आणि ही स्वप्न जिवंत करणारा आणि प्रत्यक्षात उतरवणारा विचार म्हणजे सुवर्ण कोकण कार्यशाळा. आजपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात जाऊन लाखो लोकांपर्यंत जाऊन सुवर्ण कोकणने नवे शेतकरी घडवण्यासाठी एक विचार दिलाय. हाच श्रीमंत बनवणारा आणि पूर्ण प्रशिक्षण देऊन व्यवसाय संपन्न बनवणारा विचार आता पुन्हा कार्यशाळेच्या निमित्ताने भेटीला येतोय.

सुवर्ण कोकणच्या मुंबई मुख्य कार्यालयात मागच्या काही दिवसांपासून पुन्हा कार्यशाळा कधी याबद्दल सातत्याने विचारणा होत होती. कोविड निर्बंध आता शिथिल झाल्यावर अखेर पूर्णपणे कोविड नियमांचे पालन करून आता पुन्हा पुनश्च अनलॉक करत विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अवघ्या महाराष्ट्रातुन प्रचंड मागणी असणाऱ्या व्यावसायिक शेळीपालन आणि व्यावसायिक कुक्कुटपालन या विषयावर तज्ञांच्या अभ्यासपूर्ण प्रात्यक्षिक प्रेझेंटेशनसह ही कार्यशाळा पार पडणार आहे.

सुवर्ण कोकण च्या विशेष प्रशिक्षण कार्यशाळेत सतीश परब सर हे मुख्य व्याख्याते असणार असून ते शेळीपालन आणि कुक्कुटपालन यातील व्यवासायिक श्रीमंती उलगडून दाखवणार आहेत. पण त्याचसोबत या दोन्ही विषयात ज्यांचा संशोधनात्मक अभ्यास आहे असे मान्यवर व्याख्याते देखील असणार आहेत.

व्यावसायिक कुक्कुटपालन या विषयात जागेची निवड, शेड व्यवस्थापन, कोंबड्याच्या जाती , पिल्लांचे संगोपन, साधने व उपकरण, खाद्य आणि पाणी व्यवस्थापन, ब्रूडरची व्यवस्था , लसीकरण व उपचार आणि बाजारपेठ व विक्री व्यवस्थापन याविषयावर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. आणि यासाठी  या क्षेत्रातील डॉक्टर चंद्रकांत आपसिंगे सर हे स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

याच कार्यशाळेतला दुसरा प्रमुख विषय असणार आहे बंदिस्त शेळीपालन. आणि या विषयावर बोलण्यासाठी सुमित भोसले यांना आमंत्रित केले आहे. या सत्रात शेळीपालनासाठी जागेची निवड, शेड व्यवस्थापन, शेळ्यांच्या विविध जाती, पिल्लांचे संगोपन, गाभण शेळ्यांचे संगोपन, ईदसाठी बोकड निर्मिती, चारा लागवड, उपयुक्त साधने आणी उपकरणे, लसीकरण व उपचार, लेंडीखत निर्मिती, बाजारपेठ व विक्री व्यवस्थापन अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

सुवर्ण कोकणची या विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे रविवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२१रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. डोम हॉल, S N D T कॉलेज, कामा लेन, घाटकोपर, पश्चिम, मुंबई या ठिकाणी ही कार्यशाळा पार पडणार आहे. या विशेष प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक असून त्यासाठी इच्छुकांनी7039321542 आणि 887993821 या क्रमांक वर संपर्क साधावा असे आवाहन सुवर्ण कोकणच्या वतीने करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.