कोकण रेल्वेच्या गाड्या पुन्हा नियमित वेळेत

● कोकण रेल्वेच्या पाच गाड्या पुन्हा नियमित

●सोमवारपासून नियमित गाड्या म्हणून धावणार


 कोकण रेल्वे मार्गावरील वरील पाच गाड्या सोमवारपासून (दि. १५ नोव्हेंबर) नियमित गाड्या म्हणून धावणार आहेत. करोनाच्या कालखंडात विशेष गाड्या म्हणून या गाड्या चालविल्या जात होत्या. आता त्या करोनपूर्व काळातील गाड्यांप्रमाणेच पूर्वीच्याच क्रमांकाने धावणार आहेत. तसेच त्यांचे तिकीटदरही करोनापूर्व काळानुसारच असतील, असे कोकण रेल्वेने जाहीर केले आहे.

कोकणकन्या एक्स्प्रेस ही गाडी करोनाच्या काळात विशेष गाडी म्हणून ०११११-०१११२ या क्रमांकाने धावत होती. आता ती १०१११-१०११२ या पूर्वीच्याच क्रमांकाने धावणार आहे. त्याचप्रमाणे मांडवी एक्स्प्रेस (१०१०३-१०१०४), रत्नागिरी-मडगाव (१०१०१-१०१०२), दिवा-सावंतवाडी (१०१०५-१०१०६) या दररोज, तर मडगाव-मंगळूर (१०१०७-१०१०८) या रविवारशिवाय इतर ६ दिवशी धावणाऱ्या गाडीचा त्यामध्ये समावेश आहे. या गाड्या नियमित गाड्या म्हणून धावणार आहेत, असे कोकण रेल्वेने जाहीर केले आहे. 

दरम्यानदिवा-सावंतवाडी आणि सावंतवाडी-दिवा, रत्नागिरी-मडगाव आणि मडगाव-रत्नागिरी तसेच मडगाव-मंगळूर आणि मंगळूर-मडगाव या गाड्या पॅसेंजर गाड्या असल्या तरी त्यांना तूर्त तरी एक्स्प्रेस गाड्या असेच संबोधण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.