no-questions-asked

Swiggy-no-questions-asked-period-time-off-policy

ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Swiggy ने महिला डिलिव्हरी पार्टनर्ससाठी मासिक पाळीच्या काळात ‘टाइम ऑफ पॉलिसी’ आणली आहे. मासिक पाळीच्या काळातही काम करणाऱ्या महिला डिलिव्हरी पार्टनर्सना मोठा दिलासा मिळणार आहे. मासिक पाळीच्या काळात महिला डिलिव्हरी पार्टनर्सना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारे महिलांवर या काळात परिणाम होत असतात. किंबहुना या काळाच महिलांना काही चढ- उतारांनाही सामोरं जावं लागतं. या काळात महिलांनी खरंतर आराम करणं अपेक्षित असतं, पण काही कारणास्तव म्हणा किंवा नाईलाजानं ते शक्य होत नाही. म्हणूनच सुप्रसिद्ध फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने नवा बेंचमार्क निर्माण करत ही नवी पॉलिसी आणली आहे. 

पीरियड टाइम-ऑफ पॉलिसी पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे. या पॉलिसीच्या मदतीने Swiggy मध्ये काम करणाऱ्या महिला दर महिन्याला दोन दिवसांच्या सशुल्क सुट्टीसाठी निवड करू शकतात. जे ‘पेड टाइम-ऑफ’ निवडतात त्यांना किमान कमाईची हमी देखील दिली जाणार आहे. याचा अर्थ असा की, स्विगीमधील महिला डिलिव्हरी पार्टनर्स वर्षातून २४ दिवस ऐच्छिक रजेचा पर्याय निवडू शकतात. या व्यतिरिक्त, स्विगीने महिला डिलिव्हरी पार्टनर्ससाठी कामावर ठेवण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेची हमी मिळावी यासाठी ‘सेफ झोन’ आणि चांगल्या स्वच्छता सुविधाां सारखी अनेक स्तुत्य पावले उचलली आहेत. फूड एग्रीगेटर प्लॅटफॉर्मने महिला कर्मचाऱ्यांसाठी अनेक सकारात्मक पावले उचलली आहेत. स्विगीने जाहीर केलेल्या या नव्या पॉलिसीवर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. 

© sindhudurg360°

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.