अर्थसंकेत करणार नव उद्योजकांचा सन्मान

● अर्थसंकेत नव उद्योजक पुरस्कार सोहळा २०२१ -  वर्ष सातवे

●मराठी समजातील नव उद्योजकांचे कर्तुत्व जगासमोर आणण्याचा एक आगळा प्रयत्न म्हणजेच "अर्थसंकेत नवं उद्योजक पुरस्कार सोहळा" !

अर्थसंकेत हे मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक माहिती देणारे ऑनलाईन व्यासपीठ आहे. महिना जवळपास ५० लाख हुन अधिक लोकांपर्यंत* अर्थसंकेत पोहोचत आहे. अर्थसंकेत तर्फे महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गेली सात वर्षे विविध आर्थिक व उद्योजकीय कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात .    

असे उद्योजक ज्यांनी शून्यातून एक उद्योग उभा केला. ज्यांनी आपल्या आयुष्याची जोखीम घेऊन उद्योग निर्माण केला, रोजगार निर्माण केले समाजाचे देणे फेडले. अशा उद्योजकाचे कौतुक करणे यात अर्थसंकेत नेहमी आघाडीवर असते.

नवं उद्योजक पुरस्कार हा एकमेव पुरस्कार सोहळा आहे ज्या अंतर्गत नवीन उद्योजकांचा गौरव केला जातो. ज्या उद्योजकांनी वर्ष २०११ व त्यानंतर व्यवसाय सुरु केला आहे आणि स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे त्यांना पुढच्या पायरीवर जाण्यासाठी ज्या व्यासपीठाची आवश्यकता असते ते व्यासपीठ अर्थसंकेतने निर्माण केले आहे. 

नवं उद्योजक पुरस्कार सोहळा २०२१ 
पुरस्कार विभाग

१. सर्वोत्कृष्ट नवं उद्योजक [पुरुष]

२. सर्वोत्कृष्ट नवं उद्योजक [ महिला ]

३. नाविन्याचा ध्यास

४. सामाजिक उद्योजक

५. सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार

६. विद्यार्थी उद्योजक

७. नवं उद्योजकता [ भांडवल उभारणी व नफा ]

८. नवं उद्योजकता [ रोजगार निर्मिती ]

९. लढाऊ बाणा

१०. सर्वोत्कृष्ट नवं उद्योजकता व्यवसाय


मराठी समाजाप्रती बांधिलकी जपण्यासाठी अर्थसंकेतद्वारे नेहमीच काही ना काही नवीन उपक्रम राबविले जातात. मराठीतील नव उद्योजकतेचा सन्मान करणे व त्यांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसंकेत घेऊन येत आहे. 

दिनांक - २० ऑक्टोबर २०२१

●स्थळ - BSE बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, मुंबई  

● वेळ - सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वा.

व्यवसायातील नाविन्यता, व्यावसायिक अनुभव, व्यावसायिक यश, वैयक्तिक यश, सामाजिक काम, वय व पुरस्कार या निकषांवर पुरस्कार दिला जाणार आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क - ८०८२३४९८२२

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.