नांदी नव्या प्रवेशाची

● कणकवलीची मानाची बॅरिस्टर नाथ पै एकांकिका स्पर्धा जाहीर
● खुल्या गटासोबत शालेय एकांकिकाच्या भव्य व्यासपीठाची उत्सुकता


केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात प्रतिष्ठेची एकांकिका स्पर्धा असा वकुब असणाऱ्या कणकवली येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या एकांकिका स्पर्धेची यंदा घोषणा करण्यात आली आहे. कोविड परिस्थितीत राज्य सरकारचे नियम अंमलात आणून ही स्पर्धा घेतली जाणार आहे.

● अशी असेल यंदाची स्पर्धा

मागच्या वर्षी कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता प्रतिष्ठानने  एकांकिका लेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेतील शालेय गटातील ४ व खुल्या गटातील ६ पारितोषिक विजेत्या एकांकिका व प्रथितयश लेखकांच्या शालेय गटातील ३ व खुल्या गटातील १७ एकांकिकांमधील एकांकिका सादर करणाऱ्या संघांना प्राधान्य देण्यात येईल. या व्यतिरिक्त अन्य एकांकिकाही सादर करता येतील. या स्पर्धेत शालेय गटात कमाल १० एकांकिका तर खुल्या गटात कमाल १५ एकांकिकांना प्रवेश देण्यात येईल.

● मान बहुमानाचा

बॅरिस्टर नाथ पै एकांकिका स्पर्धेत खुल्या गटासाठी अनुक्रमे ₹ १५,०००, ₹ १०,०००, ₹ ७,००० तर शालेय गटासाठी ₹ ५०००, ₹ ३०००, ₹ २००० अशी सांघिक रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येते. तर अभिनय स्त्री पुरुष, दिग्दर्शन, नेपथ्य यासाठीही रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र स्वतंत्रपणे देण्यात येतील. स्पर्धेत एकूण ६० हजार रकमेची पारितोषिके दिली जाणार आहेत. 

सज्ज व्हा पुन्हा त्या दिमाखाला

बॅरिस्टर नाथ पै एकांकिका स्पर्धा कणकवली येथे दिनांक २५ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२१ या कालावधीत घेतली जाईल. स्पर्धेची प्रवेश फी दोन्ही गटासाठी ₹ ५०० / - एवढी असून स्पर्धेचा प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर २०२१ पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचे कार्यवाह शरद सावंत यांच्या ९४२२५८४०५४ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष श्री एन. आर. देसाई यांनी केले आहे.

©sindhudurg360°

#ekankika #oneactplay #kankavali 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.