संकासुराच्या भूमीतून शेक्सपिअरकडे जाताना..

● द फाॅक्स ●

सावंतवाडी तालुक्यातील सरमळे गावातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील एका युवकाने आपल्या संघर्षमय जीवनातूनच प्रेरणा घेऊन एक नाटक लिहिलेले आहे... आणि ते ही इंग्रजीतून !  त्या नाटकाचेच शीर्षक आहे "द फाॅक्स"


कोकणाच्या या मातीत प्रतिभेचा झरा कुठून कसा वाहतो हे नक्की सांगता येणार नाही हेच खरं... सरमळे सारख्या निसर्गरम्य पण एका दुर्लक्षित गावातील दलित कुटुंबात जन्मलेला अनिल कांबळे सरमळकर हा सर्व प्राप्त परिस्थितीवर मात करत सावंतवाडी, वेंगुर्ले येथून बीए करतो काय आणि कणकवली मधून इंग्रजी विषयात एमए करतो काय... बरं एवढं करून थांबत नाही तर वैयक्तिक अनेक कटू अनुभवांंवर मात करून एक काव्यात्मक साहित्यिक दृष्टिकोन जोपासतो काय...हे सगळंच फार अजब आहे.कौतूकास्पद आहे.



त्याने गेल्या दहा बारा वर्षांत अनेक कथा, कादंबऱ्या तर लिहिल्याच तसाच एखाद दुसरा चित्रपटही लिहिला पण त्याच बरोबर मानवी सत्तांध,भयावह आणि भेसूर प्रवृत्तीवर प्रभावी भाष्य करणारं एक इंग्रजी नाटक लिहिलं तेच हे "द फाॅक्स"


या "द फाॅक्स" नाटकाची दखल नामवंत विद्रोही ब्रिटिश लेखक कवी आणि सामाजिक कार्यकर्ते बेंजामिन झेपानिया यांनी घेतली, एवढंच नव्हे तर अमेरिकेतील न्यूयॉर्क मधील जगप्रसिद्ध "ब्राॅड वे" या नावाजलेल्या थिएटर रिसर्च सेंटरमध्ये त्याचं वाचन देखील झालं आहे. पुढील काळात या नाटकाचे प्रयोग ब्राॅड वे मध्ये होणार आहेत.अमेरिकेतील नावाजलेल्या येल युनिव्हर्सिटीतील थिएटर रिसर्च विंगने नवोदित नाटककारांच्या एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी "द फाॅक्स" ह्या नाटकाला स्वीकारले आहे. अशा या पोस्ट माॅडर्न थिएट्रीक्स प्रकारातील नाटकाचे संपादन व प्रकाशन दिल्ली येथील मॅचवर्ड प्रेसने हल्लीच काही दिवसांपूर्वी केलेलं आहे.



THE FOX ...
 द फॉक्स ...
भारतीय आवृत्ती...
चार दिवसात सुमारे 450 कॉपीजची नोंदणी.
............................................................ 

द फॉक्स: 
ब्रिटन एडिशन प्रथम.
मार्च 2021.
Sale Out .. 
..................... 

( आपल्या प्रतीसाठी कृपया 8888965842 या whatsup नंबर वर आपला postal पत्ता पाठवा. प्रती प्रत किम्मत 200/ रु. तसेच पोस्टल खर्च सहीत आपल्याला 250 रुपये.google pay करता येतील. google pay नंबर आपल्याला आपल्या whatup नंबरवर देण्यात येइल)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.