चाकरमान्यांना बाप्पा पावला ! गणेशोत्सवासाठी यंदा टोलमाफी

कोकणात  जाणाऱ्या वाहनांना टोल स्टिकर
● 8 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर पर्यंत मिळणार सवलत

दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा, पुणे एक्सप्रेस वे ने कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी मिळाली आहे. चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंत्री एकनाथ शिंदेंची यांनी टोल माफीची घोषणा केली आहे. 
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी यंदाही मुंबई-गोवा, मुंबई-कोल्हापूर मार्गावर नियोजन असेल. खड्डे दुरुस्ती, पोलीस, वाहतूक पोलीस, अशा सर्व उपाययोजना करण्यासाठी आज बैठक झाली. कोकण मार्गावरील टोल सवलत, टोल स्टिकर देण्याचा निर्णय झाला. यासाठी नागरिकांनी आपल्या गाडीची माहिती दिल्यानंतर त्यांना स्टिकर दिले जाईल. गणेशोत्सवाच्या 2 दिवस आधी आणि विसर्जनाच्या 2 दिवसा नंतर पर्यंत ही सेवा असेल.टोल नाक्यांवर वाहनांची रांग लागलेली असते. .

मुंबईतून कोकणात जाण्यास सुरुवात झाली आहे. या दिवसांमध्ये कोकणात जाणाऱ्या खासगी, सरकारी बसेस, कोकण रेल्वे फुल्ल असते. सहज तिकीट मिळत नाही. खासगी वाहनाने मुंबईकर मोठ्या संख्येने कोकणात गणपतीसाठी जातात. यंदा या सर्वांना टोलमाफीची भेट मिळाली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.