नैवेद्यम आवाहनम : हॉटेल नवचैतन्यची हटके पंगत

गणपती आणि कोकणी मुलुखाचे असलेले नाते हे शब्दातीत आहे. या शब्दातीतपणात घरचा गणपती असतो, पावण्यारावळ्यांनी भरलेले घर असते, आरत्या भजनाचे सूर असतात. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे चिदानंद देणारा नैवेद्य सुख असते. प्रत्येकाच्या घरी बाप्पा असतो आणि जिथे बाप्पा असतो त्या घरात पंचपळी ही साक्षात अन्नपूर्णेचीच असते ! 

कोरोनामुळे सलग दोन वर्षे या आनंदापासून मुकलेल्या चाकरमान्यांची संख्या प्रचंड आहे. त्याचवेळी या मुंबईत यंदाही काही कारणास्तव गावी न जाऊ शकणाऱ्या बॅचलर मुलांचीही संख्या प्रचंड आहे. यंदा हीच रुखरुख लक्षात घेऊन मालवणी चवीचा मुंबईतला अस्सल स्वाद असणाऱ्या हॉटेल चैतन्यने एक वेगळा प्रयोग करण्याचा बेत आखलाय. आणि या प्रयोगाचे नाव आहे, 'मराठमोळी पारंपारीक पंगत'

मागील काही वर्षात मुंबईच्या हॉटेल विश्वात दादर पाठोपाठ अंधेरीतही  मालवणी जेवणात मित्र वाळके या तरुणाने आपला दबदबा निर्माण केलाय. हॉटेल चैतन्य या मिळालेल्या ओळखीत तो आता सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतो. मुळात बिझनेसची तंत्रशुद्ध गणिते पिढी दरपिढी बदलतात पण मित्र वाळके सारखा नाविन्याची पंगत मांडणारा मुलगा आता एका पिढीची वाट पाहत नाही, तो दर दिवशी नवे बदल करतोय.


मित्रने या नैवेद्य पंगतसाठी बनवलेला मेसेजही त्याच पद्धतीचा  आहे. तो चाकरमान्यांच्या पुढच्या पिढीला त्यांच्या लॅंग्वेजमध्ये इन्व्हाईट ठरतोय.

Team Nav Chaitanya is truly delighted to invite you all for a 'मराठमोळी पारंपारिक पंगत, on 10th Sept (Lunch)
It's Not Just A Feast - It's An Experience Worth Relishing.Starting with washing your hands from a brass पळी to enjoying our 'पंचपक्वान्नाच्या नैवेद्य' served on a lush-green Banana leaf & ending this delicious Pangat with fresh Kakadi...all this in an ambience set-up just to welcome you where there's a free-flowing aroma of अगरबत्ती, धूप & Modak with 'तूप'.

नैवेद्य पंगत to be available only on, 10th September - Friday for Lunch
⌚ From 11:00am to 4:00pm 
Pre-book your table on ⤵️
+91 9324482100
Limited Slots Available* 
पंगतीचा पत्ता -
Nav Chaitanya
Cosmopolitan Education Society Marg,
B Wing, New LIC Colony, D.N.Nagar,
Andheri West, Mumbai

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.