आजची गोष्ट कालपासून शिकवणारे गुरुजी

आधुनिक शिक्षणाचा जो प्रसार झाला त्यामध्ये प्रामुख्याने चार प्रवाहांचा विचार ठळकपणे करावा लागेल. पहिला म्हणजे इंग्रजानी स्थापन केलेल्या शिक्षण संस्था आणि त्यांच्या शाळा. मॅकोलेच्या शिक्षण पद्धतीवर आधारीत असणारी ही शिक्षण प्रणाली पुस्तकी शिक्षणावर आधारीत होती. त्यानंतरचा दुसरा प्रवाह म्हणजे इंग्रजाच्या संस्थाना पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी भारतीयांनी स्थापन केलेल्या शिक्षण प्रसारक संस्था. त्यानंतर राजर्षी शाहु महाराज, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या समकालीन शिक्षणधुरीणांनी बहुजन वर्गांपर्यंत पोहोचवलेले शिक्षण.. आणि चौथा प्रवाह होता महात्मा गांधीच्या नई तालीम सारख्या प्रत्यक्ष काम आणि शिक्षण यांच्या समन्वयाच्य़ा विचारांचा.

या सगळ्या मुळ प्रवाहात मग कॉन्व्हेट, सेमी आणि नंतर इंटरनॅशनल अशा नव्या शिक्षणपद्धतीच्या नव्या फॉरमेशनला अगोदर बालक, मग पालक आणि मग संपुर्ण समाज बदलत गेला. आणि त्याला ३६० अंशात छेद दिला तो या लॉकडाऊनच्या काळात.. 


मुळात शाळा सुरु होणार हा पालकांचा भावनिक प्रश्न आणि परिक्षेचा सोयीस्कर राजकीय प्रश्न यात शिक्षणातल्या बदलत्या स्वरुपाला सामोरी जात होती ती गरीब बिचारी मुलं..


कोरोनामुळे आज शालेय शिक्षण झपाट्याने ऑनलाईन झालय आणि त्याचा पुढचा भाग म्हणजे आपण या ऑनलाइन शिक्षणाला आपण सरावलोय हे खुप महत्त्वाचे आहे. 2020 पासून झालेला हा बदल जगाच्या दृष्टीने नवा असला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तो तसा जुनाच आहे. देवगडच्या शिरगावात एक शिक्षक आहेत. ते मुलांना ऑनलाईन गणित आणि भुमितीचे क्लास घेतात. ही गोष्ट जर इथपर्यंत वाचाल तर खुप नॉर्मल वाटेल. पण ते केवळ आज लॉकडाऊनमध्ये नाहीत तर २०१६ पासून ऑनलाईन शिकवतायत. त्यानी शिकवलेली मुले फाडफाड इंग्रजीत आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर मुलांशी गणित भुमितीच्या प्रश्नांची उकल करतात. अजुनही कमेंटमध्ये चुकून जीआयएफ कसे पडते हे जिथे आपल्याला कळत नाही तिथे २०१८ पर्यंत जवळ जवळ १०८० जीआयएफचे फक्त गणित भुमितीचे पाठ फॉरवर्ड झाले होते.

शमउद्दीन अत्तार हे नाव जिल्ह्यातील अनेकांना ठाऊक नसेल. पण ज्या मुलांना गणित भुमितीत आवड आहेत ती मुले जगाच्या पाठीवरुन त्यांच्याशी संपर्क साधतायत..मोफत ऑनलाईन शिक्षण या संकल्पनेतून अत्तार सरांनी संपुर्ण जगाला शिरगाव बनवलय. एवढं सगळ सोप्प केलय. मायक्रोसॉफ्ट वन नोटच्या माध्यमातून गणिती भुमितीच्या संकल्पना फार सहज पोहोचवल्या जातातय. एक लक्षात घ्या कुठलाच विषय अवघड नसतो. फक्त तो तुम्ही कसा समजावता यावर अवलंबून असते. 

या पुढच्या काळात नवे शैक्षणिक धोरणानुसार बदलणारी शिक्षण पद्धती आणि नवे शैक्षणिक वर्षाची सुरुवात यावर नवे शैक्षणिक जग समोर येईल. पण एक मात्र नक्की की आता ऑनलाईन ही सवय होणार आहे. पण या बदलात जो माणूस २०१६ च्या अगोदरपासून हा सगळा विचार करतोय तो किती दुरदृष्टीचा असेल याचा फक्त विचार करा.. आज जर्मनी जपानची मुले अत्तार सरांच्या मुलांशी गणित भुमितीच्या गप्पा मारतात. सोशल मिडीयाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरुन ते संवाद साधतायत. 
आपलीही गंमत आहे ना, बाकी सगळं जग आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला समजते.. फक्त आपली माणसं नाही समजत. ज्या गोष्टीला जग आज चाचपडतय तोच विचार घेऊन १९९८ साली एका संगणकाच्या माध्यमातून सुरुवात केलेले शमउद्दीन अत्तार सर आज दिपस्तंभ झालेयत.. मरहुम नसरुद्दीन रहिमान अत्तारांचे नाव  हे नाव जसे विद्यार्थीप्रिय म्हणून ओळखले यायचे अगदी तसेच आता अत्तार सर गणित भूमितीशी विद्यार्थ्यांना जोडतायत ! 

आज कोविड 19 मुळे शाळा आणि शिक्षण ही भित ओलांडून मुलांच्या घरात , मोबाईलवर आलीय. त्यात गणितासारखे विषय असे ऑनलाइन शिकवणे हे दिव्यच!
 गणित विषय ऑनलाइन शिकवताना विद्यार्थ्यांना तो समजला पाहिजे तो सोप्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी फळ्याच्या बदल्यात अनेक पर्याय शोधावे लागले, आणि मग अत्तार सरांनी मायक्रोसॉफ्टच्या वन नॉट या टूल्सचा वापर करून गणित संगणकावर शिकवायला लागले. मग हळूहळू झूम, गुगल मिट, यासारख्या माध्यमांचा वापर करून अत्तार सरांनी त्यांच्या  शाळेतील विद्यार्थ्यांना गणिताचा अध्यापन सुरू केलं. हाहा म्हणता सुरुवातीला कमी असणारे विद्यार्थी मग हळूहळू वाढू लागले. आमी मग तालुका, जिल्हा राज्य, देश आणि आता तर देवगडच्या शिरगावातून ग्लोबल गणिताचे तास सुरु असतात

ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत मात्र त्यांना या शिक्षणाच्या प्रवाहात राहणं अत्यंत महत्त्वाचं होतं. यासाठी अत्तार सरांच्या जोडीला सर्व शिक्षकांनी 65 हजार रुपये गोळा करून एक झेरॉक्स मशीन घेतली आणि त्या झेरॉक्स मशीन च्या साह्याने विद्यार्थ्यांपर्यंत लिखित स्वरूपातील शैक्षणिक साई साहित्य तयार करून वाडीवर जाऊन त्यांच्यापर्यंत ते पोहोचवत गेले. जे विद्यार्थी ऑनलाईन ला उपलब्ध होत नव्हते त्यावर विद्यार्थ्यांसाठी हा एक वेगळा ऑफलाइन पर्याय तयार करण्यात आलाय.

शिकवणे आणि त्याबरोबरच मूल्यमापन करणं ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. आणि परीक्षेसाठीं पुन्हा  गूगल क्लासरूम ( Google classroom ) नवी टूल्स वापरून  सराव परीक्षा आणि लेक्चर विद्यार्थ्यांना पाठवली जातात. विद्यार्थ्याला न समजलेला घटक तो पुन्हा पुन्हा गुगल क्लास रूम वर पाहतो. आज अत्तार सरांची मुले शिरगावपासून ते परदेशातही अगदी सहज गणित भूमिती शिकत जातायत. आज भिंत मोठी झालीय पण वॉल तळहातात आलीय.. पण या सगळ्यात एक मात्र नक्की की,  अत्तार सर जो काल विचार करत होते तो विचार आज जग करतय एवढं मात्र नक्की !


अत्तार सरांचा मोबाईल क्रमांक :  09922413492

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.