वाढतोय मिनरल मेकअपचा ट्रेंड

मिनरल मेकअप म्हणजे ज्यात कुठल्याही प्रकारच्या केमिकल्सचा वापर केलेला नसतो. खनिज पदार्थ म्हणजे झिंक ऑक्साइड, लोह अशा घटकांपासून सौंदर्य उत्पादनं म्हणजे पावडर, क्रीम आयशेड, फ़ाउंडेशन वगैरे बनवली जातात. 

बर्‍याच स्त्रियांना मेकअपची ऍलर्जी असते. लगेच रॅश येतात, पिंपल्स येतात, खाज येते, त्यांच्यासाठी मिनरल मेकअप हा उत्तम पर्याय आहे. बहुतांश मेकअपच्या उत्पादनांमुळे आपल्या चेह-यांवरील जी रंध्रं असतात ती बुजली जातात पण मिनरल मेकअप मुळे ती बुजली जात नाहीत. त्वचा श्वास घेऊ शकते. तसंच हे एसपीएफ़ म्हणजे सनस्क्रीन म्हणूनही काम करतं. 

प्रत्येक उत्पादनाला एक्स्पायरी डेट असते, पण मिनरल मेकअपला मात्र एक्स्पायरी डेटची चिंता नाही. त्यामुळे ही उत्पादनं अनेक वर्षं वापरता येतात. यात त्वचेची हानी करणारे घटक म्हणजे अल्कोहोल, परफ़्युम सारखे घटक नसल्यामुळे वापरण्यास सुरक्षित आहे. 


मिनरल मेकअपचा फ़ायदा म्हणजे त्वचेला उजाळा मिळतो. चेह-यावर सुरकुत्या येत नाही. ऍंटी एजिंग म्हणून उत्तम काम करतं. साधारण मेकअपचा प्रभाव हा ६ तास असतो. पण मिनरल मेकअपचा प्रभाव मात्र १० ते १२ तासही राहू शकतो. हे मिनरल मेकअपचं खास वैशिष्ट्य आहे.  


काही तज्ञांच्या मते मिनरल मेकअप त्वचा डीहायड्रेट करतो. तसंच तो नीट पारखून घेतला नाही तर त्वचेचं नुकसान करतो. ब-याच कंपन्या मिनरल मेकअपच्या नावाखाली कृत्रिम उत्पादनं तयार करत आहेत. त्यामुळे त्वचेचं खूप नुकसान होतं. तेव्हा मिनरल मेकअप वापरा पण उत्पादनाची योग्यता आणि प्रमाण पारखून घ्या.    

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.