त्वरा सुरवरा विमान उतरायाची

●मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या १ तास २५ मिनिटात 

● सिंधुदुर्ग विमानतळावरून विमानाचे बुकिंग ऑनलाईन सुरु

● ९ ऑक्टोंबर रोजी पहिले प्रवासी वाहतूक करणारे विमान उतरणार..

सिंधुदुर्गवासियांचे विमान उड्डाणाचे अखेर स्वप्न साकार होत असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ९ ऑक्टोंबर रोजी विमानतळावर पहिले प्रवासी वाहतूक करणारे विमान उतरणार आहे. या विमानाचे बुकिंग गुरुवार २३ सप्टेंबर पासून एअर इंडियाच्या वेबसाईटला सुरू करण्यात आली आहे 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विमानतळ आता सुरू होणार आहे या विमानतळाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सिंधुदुर्ग एअरपोर्ट या नावाने हे विमानतळ सुरू होणार असून ९ ऑक्टोंबर रोजी पहिले विमान प्रवासी घेऊन या विमानतळावर उतरणार आहे. 

असा असेल विमान प्रवास - 

●  ९ ऑक्टोंबर पासून सुरु होणारे हे विमान दररोज असणार आहे. 
● हे विमान दररोज दुपारी ११. ३५ वाजता मुंबईहून सुटून ते १ वाजेपर्यंत सिंधुदुर्गात येणार आहे.
●  सिंधुदुर्गहून मुंबईला जाण्यासाठी १ तास २५ वाजता सुटून २.५० वाजेपर्यंत मुंबईत जाणार आहे. 
●हे विमान ७० सीट चे असून केंद्राच्या उडान योजनेत अंतर्भूत असणार आहे
● सिंधुदुर्ग ते मुंबई रस्त्याने प्रवास केल्यास सुमारे ९ तास ते २० मिनिटे लागतात,  हाच प्रवास हवाईमार्गे विमानाने केल्यास प्रवाशांसाठी फक्त १ तास २५ मिनिटांचा हा प्रवास असणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा इतर वेळ वाचणार आहे.
 
पूरक विमान प्रवासाची सोय

सिंधुदुर्गातून मुंबई ला जाणारे विमान हे मुंबई येथे २ वाजून ५० मिनिटांनी पोचणार आहे. त्यानंतर मुंबई विमानतळावरून ज्या विमानसेवा असतात त्या दिल्ली बेंगलोर, कोलकत्ता, हैदराबाद आणि चेन्नई सारख्या महानगरात जाणाऱ्या विमानसेवेतून या महानगरांमध्ये जायचे असेल तर या विमान सेवेचा फायदा होऊ शकणार आहे

सिंधुदुर्ग एअरपोर्ट वर उतरल्यानंतर उत्तर गोव्यात जाणार्‍या प्रवाशांसाठी हे विमानतळ चांगला पर्याय आहे चिपी वरून तेरेखोल, अरंबोल आणि मांद्रेम समुद्रकिनारा-यांसाठी ड्रायव्हिंग अंतर अंदाजे ६० किमी आहे. गोव्याच्या दाबोळी विमानतळाच्या समान आहे. त्यामुळे सिंधुदुर्गचे पर्यटन पाहून प्रवासी गोव्याला जाऊ शकतो.

दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ ऑक्टोंबरला पहिले प्रवासी विमान उतरणार आहे आणि या विमानाचे ऑनलाईन बुकिंग आज गुरुवार २३ सप्टेंबर पासून एअर इंडियाच्या www.airIndia.in या वेबसाईटला सुरू झाले आहे यासाठी प्रवाशांनीSDW हा बुकिंग कोड नोंद करावा अशी माहिती त्यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.