एका सप्टेंबरची एका वर्षाची गोष्ट

कोरोना आणि लॉकडाऊन आता जगण्याची सवय झालीय. जगण्याच्या आणि वर्तमानाच्या खूप साऱ्या गोष्टी प्रत्येकजणाना खूप काही शिकवत गेल्या. ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेत रोजगार थांबला, अनेक संसार उध्वस्त झाले. पण काही गोष्टी अशा होत्या की ज्या काळात नव्याने लिहिल्या गेल्या. आणि इतरांसाठी नव्या प्रेरणादायी ठरल्या. सावंतवाडीच्या सौ. प्रज्ञा मोंडकर यांची ही गोष्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलाशक्तीच्या नव्या हिमतीची गोष्ट आहे. मोंडकर्स फूड या नावाने सुरु झालेला हा प्रवास एक ब्रँड बनलाय.
प्रवास मोंडकर्स फुडचा 

मोंडकर्स फुडची स्थापना बरोबर एक वर्षांपूर्वी १ सप्टेंबर २०२० रोजी झाली. आजच्या काळाची गरज लक्षात घेऊन मोंडकर्स फूड अँप लॉन्च झाले. पण त्यापूर्वी मे महिन्यात प्रज्ञा मोंडकर यांनी 'स्नॅक्स ॲट युअर डोअर'चा प्रयोग केला. जुलैमध्ये लॉकडाऊन काळात मोंडकर्स फूडचा व्हाट्सअँप ग्रुप सुरु झाला. परिचित लोक फूड ऑर्डर करायचे आणि ते घरपोच देण्यात यायचे. आज जवळपास १५० मेंबर्स आहेत. पुढे मोंडकर्स फूडचे स्वतःचे ॲप असावे, असा विचार पुढे आला. त्यासाठी मार्केटमध्ये सर्व्हे करण्यात आला. त्यावेळी काही बड्या कंपन्यांची ॲप मार्केटमध्ये होती. अनेक हॉटेल्स त्याला कनेक्ट आहेत. तो प्लॅटफॉर्म वापरत होती. म्हणून छोटे पण स्वतंत्र ॲप बनवण्याचा विचार झाला. आणि १ सप्टेंबर २०२० ला ते डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, डॉ. मुग्धा ठाकरे यांच्या हस्ते लाँचही झाले. आणि  एक मोठा प्लॅटफॉर्म मोंडकर्स फूडला मिळाला आणि तोच टर्निंग पॉइन्ट ठरला.


लॉकडाऊनचा काळ सर्वांसाठी फारच कठीण राहिला. वैयक्तिक सुरक्षेची काळजी सर्वानाच होती. हॉटेल्स बंद होती. बॅचलर्स लोक पर्याय शोधत होते. क्वारंटाईन लोकांच्या जेवणाचा प्रश्न होता. पण हे एक आव्हान समजून मोंडकर्स फूडच्या टीमने काम केले. एक एकजण जोडत गेले आणि हा प्रवास दौडू लागला. 

पाण्यात उडी घेतल्याशिवाय त्याची खोली समजत नाही. तसे उद्योग सुरु झाल्याशिवाय त्यातले खाचखळगे  लक्षात येत नाहीत. आज प्रज्ञा मोंडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चवीला ब्रँड बनवलाय.

घरच्यासारखे नव्हे घरचेच, ही आमची टॅगलाईन आहे. आणि मोंडकर्स फूड ती पाळण्याचा १०० टक्के प्रयत्न करतो.  केवळ उदरभरण नोहे, तर चवीचे देण्याचा प्रयत्न आणि प्रामाणिकपणा चवीतही उतरला आहे. अस्सल मालवणी चवीला पारंपरिक, आरोग्यदायी आणि ताजे खाद्यपदार्थ देण्याचा प्रयत्न आज प्रेरणादायी बनलाय

ब्रँडच्या यशाचे रहस्य

हॉटेल्स बंद असल्यामुळे अनेकजण आज मोंडकर्स फूडस प्राधान्य देतायत. खाण्याच्या बाबतीत एक सत्य आहे की चव जिभेवर रेंगाळली पाहिजे. माऊथ पब्लिसिटी हीच तुमच्या व्यवसायाची खरी जाहिरात. बोर्ड लावून तुमचे खाद्यपदार्थ विकले जरूर जातील. पण पदार्थाना चव असेल तर तुमचे नाव ओठावर रेंगाळत राहील, हेच या व्यवसायातील यशाचे इंगित आहे. मोंडकर्स फूड्स ने पहिल्या वर्षात  ५००० ऑर्डर्स पूर्ण केल्या आहेत. आज मोंडकर्स फूड ॲप ७०० हून अधिक लोक वापरत आहेत. या एवढ्या मोठ्या ग्राहक पसाऱ्यामुळेच मोंडकर्स फुड्सचे आज स्वतंत्र व्यावसायिक किचन उभे आहे.


ब्रँड मागचा चेहरा

सौ. प्रज्ञा मोंडकर, या नावापुढे केवळ संचालिका, मोंडकर्स फूड एवढीच ओळख नाहीय तर या नावाने महिला उद्योजकतेचा एक नवा आयाम निर्माण केलाय. मालवणी आणि कोकणी खाद्यसंस्कृतीला नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन नवनवे ग्राहक आज जोडले जातायत. 


आजच्या उद्योजकतेची गोष्ट 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज उद्योजकीय चर्चेला आता नव्याने सुरवात झालीय. आजच्या ग्राहकांसाठी जर उद्योग करायचा असेल तर आजच्या जगण्याचाच विचार करायला हवा.  मोंडकर्स फुड्सने आज चव आणि विश्वासार्हता जपलीय. गुगल प्ले स्टोअर्स वरुन मोंडकर्स फुड्स हे एप उपलब्ध आहे. आज शहरात जगणे मोबाईलवर उतरल आहे आणि त्याचवेळी गावखेड्यातील ही अस्सल चव मोबाईल एपच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने ब्रँड बनलीय

 मोंडकर्स फुड्स, सावंतवाडी
📞9420208656

Post a Comment

3 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. खरंच प्रशंसनीय प्रवास आहे... शुभेच्छा!

    ReplyDelete
  2. Best wishes for your business success

    ReplyDelete