ई श्रम पोर्टल


 केंद्रातील मोदी सरकारने (Modi government) 26 ऑगस्टला असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई श्रम पोर्टल (e-SHRAM Portal) लाँच केले आहे. अशावेळी जर तुम्ही हे कार्ड तयार केले तर तुम्हाला सरकारकडून (e-SHRAM Card) अनेक सुविधा दिल्या जातील.


काय आहे ई श्रम पोर्टल

केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या लोकांसाठी ई-श्रम पोर्टलची सुरुवात केली आहे. येथे मजूर आपले कार्ड बनवू शकतात. या कार्ड धारकांना सरकारकडून मदत दिली जाईल आणि त्यांना सरकारी योजनांचा लाभ सुद्धा मिळेल. येथे देशातील प्रत्येक कामगाराची नोंद असेल. कोट्यवधी कामगारांना नवीन ओळख मिळेल. 


● जाणून घ्या ई श्रम पोर्टल बद्दल

ई श्रम पोर्टलच्या मदतीने मजूरांचे आकडे आणि माहिती जमवली जाईल. त्याचा आधारावर मजूरांसाठी योजना आणि नियम बनवले जातील. सरकार ठरवेल की, योजनांचा लाभ असंघटित क्षेत्रातील मजूरांपर्यंत कसा पोहचवावा. ‘E-Shram’ पोर्टलची सुरुवात केली असून याद्वारे असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या लोकांना फायदा होणार आहे. या वेबसाइटद्वारे मजूर आपले E-Shram Card बनवू शकतात आणि ज्या लोकांचे हे कार्ड तयार होईल त्यांना सरकारकडून अनेक सुविधा दिल्या जातील. सोबत मजूरांसाठी सुरू केलेल्या योजनांचा सुद्धा लाभ प्रथम या लोकांना होईल.



ई श्रम पोर्टलमुळे मिळेल अपघाती विम्याचे कवच

जर कुणी मजूराने ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन केले असेल तर त्यास दोन लाख रुपयांच्या अ‍ॅक्सीडेंटल इन्श्युरन्सचा लाभ मिळेल. यामध्ये एक वर्षाचा प्रीमियम सरकारकडून दिला जाईल. रजिस्टर्ड मजूराचा जर दुर्घटनेत मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर त्यास 2 लाख रुपये मिळू शकतात. आंशिक प्रकारे अपंगत्व आल्यास इन्श्युरन्स अंतर्गत एक लाख रुपये दिले जातील.


● e-SHRAM कार्डसाठी रजिस्ट्रेशन पद्धत 

Step-1. कोणत्याही इंटरनेट ब्राऊझरच्या सर्चमध्ये e-SHRAM पोर्टल पेजचा अधिकृत वेब अ‍ॅड्रेस – https://www.eshram.gov.in/ टाइप करा.

Step- 2. यानंतर होमपेजवर, ई-श्रमवर नोंदणी करा च्या लिंकवर क्लिक करा.

Step-3. यानंतर सेल्फ रजिस्ट्रेशन https://register.eshram.gov.in/#/user/self वर क्लिक करा.

Step-4. सेल्फ रजिस्ट्रेशनवर यूजरला आपला आधार लिंक्ड मोबाइल नंबर टाकावा लागेल.

Step-5. कॅप्चा (captcha) नोंदवा आणि निवडा की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) किंवा कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) पर्यायाचे सदस्य आहे आणि ओटीपी पाठवा वर क्लिक करा.

Step-6. नंतर नोंदणी प्रकिया पूर्ण करण्यासाठी बँक खात्याच्या डिटेल नोंदवा आणि पुढील प्रक्रियेचे पालन करा.

eshram.gov.in वर दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही जवळच्या सीएससीवर जाऊ शकता आणि बायोमेट्रिक पडताणी प्रक्रियेच्या माध्यमातून नोंदणी करू शकता.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.