पैठणीबद्दल बोलणे म्हणजे ती सिंगल पदर की डबल पदर एवढ्या वरही बोलून तुम्ही थांबू शकता किंवा मग पैठणी, सेमी पैठणी, प्युअर सिल्क पैठणी, चंद्रकला पैठणी, गंधर्व पैठणी, महाराणी पैठणी, नारायणी पैठणी, पेशवाई पैठणी, राजेशाही पैठणी, पिकॉक पैठणी, हातपदर पैठणी, ऑलॉव्हर पैठणी, ब्रोकेड पैठणी, धुपछाव पैठणी, कडीयल पैठणी, सेमी पैठणी, कॉटन पैठणी असा न संपणारा नावाचा हातमाग विणतच राहील..
निनाद राणेनी या उद्योगात पाय रोवताना मूळ कोकणी चिवटपणा जपला आणि त्याचा अभ्यास म्हणून वापर सुरू केला. भारतभर पैठणी विक्रीच्या निमित्ताने फिरताना पैठणी आणि तिच्या भव्यतेची जाणीव राणेंना एका मोठ्या उद्योजक बनवणारी ठरली. कालनिर्णयकार जयंतराव साळगावकर यांनी निनाद राणे यांच्यातील उद्यमशीलता हेरली आणि त्यांना नाविन्याची प्रेरणा दिली.
आजही निनाद राणे त्याच वाटेवरून पुढे जातायत. एक मालवणी माणूस दुसऱ्या मालवणी माणसाच्या मागे फक्त आशीर्वाद म्हणून जरी उभा राहिला ना तरी जग जिंकण्याला दुसरे काही लागत नाही. आज राणेज फक्त पैठणीएवढंच मर्यादित न राहता पैठणीतले सगळं काही म्हणजे फक्त राणेज पैठणी बनले आहेत.
पैठणीच्या दुकानात फक्त पैठणीच नाही तर पैठणीसोबत पैठणीच्या आणखी काही वस्तू तयार केल्या पाहिजेत हा स्टार्टअप या सगळ्या आर्थिक गणितातला एक मोठा भाग बनला. पैठणी साडी सोबत पैठणी पर्स आली. आणि मग दिवाणखाण्याला श्रीमंत बनवणारी पैठणी फ्रेम आली. आणि मग पैठणी दुप्पटे, पैठणी टॉप्स, पैठणी जाकीट अशी रेंज सुरूच झाली.. या सगळ्यात निनाद राणे प्रत्येक वस्तूतली पैठणी शोधत राहिले आणि पैठणी आभाळ उजळवत राहिली
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार अशा दिग्गजांनी उद्योजक म्हणून पाठीवर मारलेली थाप निनाद राणेना मराठी उद्योजक म्हणून वेगळी ओळख देणारी ठरलीय
पैठणीमध्ये साडी आणि इतर प्रकार पण राणे पैठणीमध्ये आहेतच पण पैठणी ब्रँड लहान मुले आणि पुरुषांसाठीही त्यांनी ब्रँड म्हणून तयार केलाय.. पैठणी कॅप, पैठणी कोठी, पैठणी टाय, पैठणी टाय अशा मेन्सयुजर्स एक्सेसरिज राणेज पैठणीने तयार केल्या आहेत.
मागच्या वर्षभरात जवळ जवळ सगळ्याच व्यवसायाना कोरोनाचा फटका बसला. दुकानं बंद झाली. पण या काळात निनाद यांनी पुन्हा आपल्यातला अभ्यासूपणा जागृत केला आणि या ब्रँड ला एक वेगळी ओळख मिळाली. पैठणी मास्क आणी चक्क पैठणी छत्री देखील !
मुळात पैठणी ही तशी दूर पडत चाललेल्या संस्कृतीत जुनेपणाची उब देणारी होतीच त्याला राणेज पैठणीने एक नवा आयाम दिला. एका मालवणी माणसाची ही धडपड केवळ आर्थिक व्यवसायापेक्षाही महाराष्ट्राच्या महावस्त्राची महती मिरवणारी आहे. कणकवलीच्या जानवली घरटनवाडीच्या राणेंच्या या मुलाची मराठी उद्योगविश्वात एक वेगळीच भरारी आहे. आणि आजही जानवलीच्या मातीतला आणी दाणोलीच्या श्री साटम महाराजांचा आशीर्वाद घेऊनच राणेज पैठणी आपला नवा ब्रँड मार्केटमध्ये आणते
कोकणी माणसाने उद्योगाकडे वळलंच पाहिजे आणि केवळ उद्योग नाही तर त्यातील नावीन्यच तुम्हाला ब्रँड म्हणून उत्तुंग बनवतो. आज निनाद राणे आणि पल्लवी राणे या दोघांनीही निर्माण केलेला हा ब्रँड आज आपली वेगळी ओळख निर्माण करतायत. पैठणी फ्रेंचायजीच्या माध्यमातून राणेंनी साडेचारशेहुन अनेक गृहिणींना उद्योजिका म्हणून वेगळी ओळख दिलीय. आज त्यांच्या या उद्यमशीलतेतून नवे उद्योजक घडण्याची गरज आहे. त्याच्या या ब्रँडला आणि कोकणचा माणूस निर्माण करू शकतो या विश्वासाला सलाम !
संपर्क - राणेज पैठणी, दादर
022-24375242
©sindhudurg360
(कृपया लेख कॉपी पेस्ट करण्यापेक्षा या लेखाची लिंक शेअर करा.. कारण पैठणी ही पैठणी असते, आणि सेमी ही सेमी असते !! धन्यवाद)
राणेंच्या पैठणीचा प्रवास खूपच स्फूर्तिदायक आहे! मालवणी तरुणांनी निनाद राणे यांच्या पासून स्फूर्ती घ्यायला हवी! राणेंच्या पैठणीचा जगभर झेंडा फडकावा, हीच सदिच्छा ! यानिमित्ताने जानवली - आंबोली खोरे - चौकुल या निसर्गरम्य परिसराचीही सर्वांना ओळख व्हावी ! हार्दिक शुभेच्छा!
ReplyDelete