1 सप्टेंबरपासून बदलतायत हे आर्थिक नियम

● एक सप्टेंबरपासून बदलणार 'हे' नियम
● प्रत्येकाला ठाऊक असले पाहिजेत हे नवे बदल

मागील काही वर्षात दर महिन्याच्या पहिल्या तारखेला काही गोष्टींमध्ये बदल होतात. सप्टेंबरपासूनही दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणारे काही बदल होणार आहेत. त्यात कोणते नियम बदलणार आहेत, त्याचा काय परिणाम होऊ शकतो, याबाबत जाणून घेऊ या..

पॅन-आधार लिंकिंग

पॅनकार्ड-आधार लिंकिंगसाठी दिलेली मुदत सप्टेंबरमध्ये संपणार आहे. स्टेट बँकेने पॅन-आधार लिंकिंगसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यात लिंकिंग न केल्यास स्टेट बँकेच्या सुविधा बंद होतील.

घरगुती सिलेंडरच्या दरात बदल

जुलैपासून सातत्याने घरगुती सिलेंडरचे दर वाढत आहेत. त्यामुळे सप्टेंबरमध्येही हाच कित्ता गिरवला जाऊ शकतो. सप्टेंबरमध्ये घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. 

आधार-पीएफ लिंकिंग 

आधारकार्ड आणि भविष्य निर्वाह निधी खाते (PF) लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेली मुदतवाढ सप्टेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे आधार व पीएफ खाते लिंक केलेले नसल्यास कंपनी तुमच्या खात्यात पीएफची रक्कम जमा करू शकणार नाही.

GSTR-1 फायलिंगची अंमलबजावणी

'जीएसटीआर-1 फायलिंग' पद्धतीची अंमलबजावणी सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. त्यानुसार एखाद्या व्यक्तीने 'जीएसटी' अंतर्गत नोंदणी केली, पण 'जीएसटीआर -3B' फॉर्म भरलेला नसेल, तर त्या व्यक्तीला 'GSTR-1' फॉर्मही भरता येणार नाही.

चेक क्लीअरन्स 

रिझर्व्ह बँकेच्या नवा नियमानुसार, आता बचत खात्यासाठी इंटरनेट बँकिंग सुविधा नसेल, तर 50,000 रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे धनादेश देणे त्रासदायक ठरू शकते. बँकांनी आता 'पॉझिटिव्ह पे सिस्टीम' (PPS) आणली आहे. त्याची अंमलबजावणी 1 सप्टेंबरपासून होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.