कोकण रेल्वे आणि कोकणचे एक अतूट नाते आहे. केवळ चाकरमान्यांचीच नाही तर पर्यटकांची पसंती ही कोकण रेल्वे प्रवासाला असते. याच निसर्गसौंदर्य पाहणाऱ्या पर्यटक आणि अर्थात स्थानिकांनाही एक नवी संधी उपलब्ध होणार आहे आणि ती म्हणजे मिनी ट्रेनची!
सिंधुदुर्गमध्ये मिनी ट्रेन सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्री व अधिकाऱ्यांशी चर्चा करून मिनिट्रेनसाठी ट्रॅक तयार करण्याचा प्रस्तावही रेल्वेमंत्रालयला देण्यात आला आहे.
कणकवली ते नांदगाव, देवगड,मालवण ,वेंगुर्ला आणि पुन्हा कणकवली असा मिनीट्रेनसाठी ट्रॅक तयार करण्याचा प्रस्ताव असून याद्वारे पर्यटन जिल्ह्याला एक वेगळी चालना मिळणार आहे
मिनी ट्रेनच्या माध्यमातून कमी वेळेत जास्तीत जास्त पर्यटन स्थळांचे दर्शन घेणे शक्य होणार आहे. त्याचवेळी मिनी ट्रेनच्या माध्यमातून मालवाहतूकही करता येणार आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिली आहे.
मिनी ट्रेन ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी खूप संकल्पना असून लोकांनी सहकार्य केल्यास त्या टप्पा टप्याने अंमलात आणणार आहे अशी माहिती केंद्रीय सूक्ष्म व लघुउद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.