कणकवलीच्या विवेक मुंबरकरच्या यशाची नवी भरारी

सिंधुदुर्ग सुपुत्राची नव्या वाटेला गवसणी

कणकवलीच्या विवेक राजेंद्र मुंबरकर vivek rajendra mumbarkar याने कणकवलीच्या शैक्षणिक क्षेत्रात एका नव्या शिरपेचाची नोंद केलीय. विवेक मुंबरकर याने आंतरराष्ट्रीय दर्जाची फुड सेफ्टी ऑडीटर food safty auditor परिक्षेत घवघवीत यश मिळवून नवा मान संपादन केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर फूड हॉस्पिटलेटी मॅनेजमेंटमध्ये या परीक्षेला प्रचंड मोठा दर्जा मानला जातो.

विवेकच्या यशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी वेगळं करण्यासाठी एक नवी वाट निर्माण झालीय. आंतरराष्ट्रीय दर्जाची फुड सेफ्टी ऑडीटर ही परीक्षा युनायटेड किंग्डम येथील BRCGS- Brand Recognition Compliance Global System (UK based) संस्थेमार्फत घेण्यात आली होती. 

ही परीक्षा अत्यंत खडतर मानली जाते. अतिशय कमी विद्यार्थी या परीक्षेत पास होतात. ही परीक्षा पास होण्यासाठी फक्त दोनच संधी दिल्या जातात.विवेकची पहिल्यावेळी फक्त दोनच मार्कांसाठी परीक्षा हूकली होती.पण दुसऱ्या संधीत १०० पैकी ८६ गुण मिळवून उत्तीर्ण झाला.

विवेक याने २०१६ साली गोगटे  जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी येथून(B.Sc - Biotechnology), २०१८ साली LP युनिव्हर्सिटी, पंजाब येथून Food Science and Technology  या विषयात M.Sc.पूर्ण केली. विवेक सध्या सद्या कोपरखैरणे, मुंबई येथे टाटा कंझ्युमर्स कंपनीत कार्यरत आहे. विवेक हा कणकवली महाविद्यालयाचे ग्रामीण विकास विभाग प्रमुख प्रा. राजेंद्र मुंबरकर यांचा मुलगा आहे

फूड सेफ्टी ऑडिट म्हणजे नेमकं काय ?

आफ्टर कोविड फूड हॉटेलिंग जगात फूड सेफ्टीला सगळ्यात जास्त प्राधान्याने महत्व दिलं जातं आहे. अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता ऑडिट विविध कारणांमुळे अन्न उद्योगात मोठ्या प्रमाणावर केले जातात. सध्या, अन्न सुरक्षा आणि अन्न गुणवत्तेवर ग्राहकांची वाढलेली आवड,अंशतः, अलीकडील अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता मानकांवर अवलंबून आहे. ब्रिटिश रिटेल कन्सोर्टियम (बीआरसी) ग्लोबल स्टँडर्ड्सवर अन्न सुरक्षा आणि गुणवत्तेचे काम प्रथम 1996 मध्ये सुरू झाले होते


©सिंधुदुर्ग360°

Post a Comment

3 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.