आता कॅश नाही, 'ई-रुपी' सेवा !

● डिजिटल क्रांतीच्या दिशेने मोदींजीचे आणखी एक पाऊल..

● जाणून घ्या  केंद्र सरकारची नवी 'ई-रुपी' सेवा !
सध्याच्या काळात अनेक जण कॅशलेस व्यवहार करताना दिसत आहेत. केंद्र सरकारही नागरिकांना डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन देत आहे. अशा व्यवहारावर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी prime minister narendra modi  यांच्या हस्ते 2 ऑगस्ट पासून डिजिटल व्यवहारासाठी उपयुक्त अशा 'ई-रुपी' (e-RUPI) सेवेचा प्रारंभ केला जाणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था Indian economy डिजिटल क्रांतीकडे घेऊन जाण्याच्या दिशेने टाकलेले हे आणखी एक पाऊल ठरणार आहे. 'ई-रुपी' हे कॅशलेस, कॉन्टॅक्टलेस माध्यम आहे.

देशातील जास्तीत जास्त आर्थिक व्यवहार कॅशलेस करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत. आता केंद्र सरकारने central government डिजिटल क्रांतीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढं टाकलं आहे. ई-रुपीमुळे (e-RUPI) 'इलेक्ट्रॉनिक व्हाऊचर'चा विचार पुढे येऊन सुशासन निर्माण होईल, असे पंतप्रधान कार्यालयाने pmo म्हटलंय.

ई-रुपी' कसे काम करणार ?

▪️ हे एक क्यूआर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंग आधारित ई-व्हाउचर आहे, जे लाभार्थ्यांच्या मोबाईलवर दिले जाईल.

▪️ वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या सहकार्याने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने त्यांच्या यूपीआय upi प्लॅटफॉर्मवर हे विकसित केले आहे.

▪️ माता आणि बालकल्याण योजना, टीबी निर्मूलन कार्यक्रम, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना aayushman bharat yojna, फर्टीलायझर सबसिडीसाठी या सेवेचा वापर केला जाऊ शकतो.

©sindhudurg360°

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.