दिनांक 22 जुलैला आलेल्या महापुराने चिपळूण महाडसह कोकण किनारपट्टीला प्रचंड तडाखा बसला होता. या अगोदर फयान, निसर्ग आणि तौक्ते वादळाने कंबरडे मोडलेल्या कोकणच्या सामाजिक आणि आर्थिक बळकटी देण्याची आधार देण्याची गरज निर्माण झालीय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सगळ्या संकटात आता तत्कालीन उपाययोजना पेक्षा संरचनात्मक भरीव काम करण्याचा निर्णय घेतलाय.