गोड्या पाण्यासाठी आता 'इ-फिश'

कोकण म्हणजे समुद्रातील मासे आणि मासेमारी हे एक घट्ट समीकरण आहे. मात्र मागील काही वर्षात या सोबतच गोड्या पाण्यातील मत्स्यशेती याकडे कोकणातील मत्स्य शेतकऱ्यांचा ओढा वाढतोय. . कोरोना नंतरच्या काळात देशाची अर्थव्यवस्था सुधारणे हे एक मोठे आव्हान असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासींयाना आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिलेला आहे. अशावेळी मत्स्य व्यवसाय व निगडीत लघु उदयोगातुन स्वंयरोजगार निर्मिती घडवून आणणे शक्य आहे. अनेक इच्छुक शेतकरी बांधवांना परीपुर्ण माहिती व योग्य मार्गदर्शनाच्या अभावी मत्स्य व्यवसाय करणे शक्य होत नाही. मात्र अशा नवमत्स्यउद्योजकांच्या मदतीसाठी आता 'इ-फिश' आले आहेत



डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठ, दापोली अंतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी द्वारे गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन  या विषयावर efish-MBRS-DBSKKV एप विकसित करण्यात आले आहे.


 
सदर अपमध्ये सामन्य प्रश्न, मत्स्य संवर्धन व्यवस्थापन, आधुनिक मत्स्य संवर्धन, शासकीय योजना, सामुग्री पुरवठादार, आमच्याशी संपर्क साधा, कॅल्क्युलेटर, प्रश्न विचारा आणि नोंदणी करणे या बाबींचा समावेश आहे. 


गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन या विषयावरील efish-MBRS- DBSKKV ऍप मत्स्य शेतकर्यांना मोबाईलवर डाऊनलोड करण्याकरिता playstore वर https://play.google.com/store/apps/details?id=com.efish.user या लिंकवर उपलब्ध आहे.


मागील काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवमत्स्य शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करतोय. अशा या नवमत्स्य शेतकऱ्यांना विद्यापीठाचे हे इ-फिश एप खूपच उपयुक्त ठरणार आहे

अधिक माहिती

● गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपण इ फिश एप डाऊनलोड करा

● कोकण कृषी विद्यापीठ दापोली अथवा मूळदे येथील केंद्र यांच्याशी संपर्क साधून आपण परिपूर्ण मत्स्यशिक्षण घ्या

● यासोबतच, आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवमत्स्य शेतकरी होऊ इच्छित असाल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात खाऱ्या, निमखाऱ्या, गोड्या पाण्यातील मच्छी संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या निलक्रांती मत्स्य पर्यटन व कृषी सहकारी संस्थेशी अवश्य संपर्क साधा
संपर्क - रविकिरण तोरसकर
९४०४९००३०३/७०६६९००३०३

©सिंधुदुर्ग360

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.