या रे या.. सारे या !


कोकणचा गणेशोत्सव म्हणजे केवळ कोकणसाठीच नाहीतर मुंबईकर चाकरमान्यासाठी श्वास.. मागच्या वर्षी कोरोनाचे सावट गंभीर असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. यंदाही परिस्थिती अगदी तशीच असली तरी चाकरमान्यांच्या गणेशोत्सवाच्या प्रवासासाठी रेल्वे आणि एसटी सरसावली आहे. गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाकडून कोकणासाठी २,२०० गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. या गाडय़ांचे आरक्षण १६ जुलैपासून सुरू होत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. तर त्याचवेळी रेल्वेनेही तब्बल ७२ विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय.


एसटीच्या २२०० बसेस

यंदा गणेशोत्सव १० सप्टेंबरपासून सुरु होतोय. एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवासाठी ४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२१ दरम्यान जादा गाडय़ांचा प्रवास सुरू राहील. तर १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान या गाडय़ा कोकणातून परतीच्या प्रवासाला लागतील. १६ जुलै २०२१ पासून आरक्षणाला सुरुवात होणार असून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे म्हणजेच एकाच वेळी आरक्षण करता येणार आहे. 
जर तिसरी लाट आलीच तर काय ?

करोनामुळे निर्बंध लागू झाले आणि त्या कारणाने प्रवाशाने तिकीट रद्द के ल्यावर त्याचा संपूर्ण परतावा देण्याचे नियोजन विचाराधिन आहे. दिली. त्यामुळे कोरोनाकाळात गणेशोत्सवात चाकरमान्याला कोणताही आर्थिक फटका बसू नये याची काळजी घेण्यात येतय. 

कोरोनाकाळातली एसटी प्रवासाची काळजी

मुंबई, ठाणे, पालघरमधून कोकणसाठी ४ सप्टेंबरपासून गाडय़ा सुटतील. परंतु करोना साथीच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होत आहे. तिसरी लाट आलीच तर  कोकणात जाण्यासाठी विलगीकरणाचा कालावधी असेल की नाही याबाबत अजुनही काहीच ठाम निर्णय झालेला नसल्याने चाकरमान्यांचा प्रतिसाद स्पष्ट व्हायला थोडा अवधी लागेल. पण प्रवासादरम्यान एसटी महामंडळ मात्र पुर्ण काळजी घेणार आहे.

प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतूक केल्या जाणार असून प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मुखपट्टीचा वापर बंधनकारक आहे. गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरुपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार असल्याचे महामंडळाने सांगितले.

यंदा ग्रुप बुकींगचे काय ?

कोकणात जाणारा चाकरमानी हा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी जातो. त्यामुळे बहुतांश वेळा एका गावातील लोकांकडून संपुर्ण विशेष एसटी बुकींग करण्याचे प्रकार होत असतात. अशा मुंबईकर ग्रामस्थ मंडळासाठी एसटीने वेगळा निर्णय घेतलाय. २,२०० जादा गाडय़ांमध्ये ८०० गाडय़ा समूह आरक्षणासाठी उपलब्ध के ल्या आहेत. समूह आरक्षणाच्या तारखा वेगवेगळ्या असून एसटी महामंडळाकडून त्या लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ऊर्वरित जादा गाडय़ांचे आरक्षण मात्र १६ जुलैपासून सुरू होईल.

कशी मिळवाल गणेशोत्सव बसेसची माहिती
गणेशोत्सव स्पेशल बससाठी एसटी आगारात तुम्हाला माहिती मिळेल या व्यतिरिक्त एमएसआरटीसी या मोबाईल एपवर आपण बसेसची माहिती मिळवू शकता.


एमएसआरटीसी वेबसाईट लिंक- https://msrtc.maharashtra.gov.in/
एमएसआरटीसी मोबाईल एप-
 https://play.google.com/store/apps/details?id=com.expscs.msrtc&hl=en_IN&gl=US

रेल्वेचे काय नियोजन?
मागील काही वर्षात चाकरमान्याला एसटीपेक्षा जास्त कोकण रेल्वेचा आधार जास्त वाटू लागलाय. विशेषत गणेशोत्सव आणि मे महिन्याच्या सुट्टीत ट्रेन चाकरमान्यांमुळे हाऊसफुल्ल असते. यामुळेच यंदाही वाढीव गर्दीचे नियोजन करुन असून विशेष ७२ गाड्या सोडण्यात येणार आहेत.

यावर्षीच्या गणपती उत्सवा दरम्यान प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी सेंट्रल रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/पनवेल आणि सावंतवाडी रोड/रत्नागिरी दरम्यान विशेष ७२ गाड्या चालवण्यात येणार आहेत.गणेश उत्सवासाठी मुंबईतून आपआपल्या गावी जाणाऱ्या कोकणवासीयांची प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
कोणत्या गाडीच्या किती फेऱ्या होणार?

● सेंट्रल रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल आणि सावंतवाडी रोड/रत्नागिरी दरम्यान विशेष ७२ गाड्या चालवण्यात येणार आहेत. 
● सीएसएमटी-सावंतवाडी रोड डेली स्पेशल या गाडीच्या एकूण ३६ फेऱ्या होतील. 
● सीएसएमटी-रत्नागिरी बाय विकली स्पेशल या गाडीच्या १० फेऱ्या होणार आहेत.
● पनवेल- सावंतवाडी रोड ट्राय विकली स्पेशल या गाडीच्या १६ फेऱ्या होतील 
● पनवेल रत्नागिरी बाय विकली स्पेशल या गाडीच्या एकूण १० फेऱ्या होणार आहेत, 
कसं कराल रेल्वे प्रवासाचे नियोजन

रेल्वे प्रवासाच्या आरक्षणासाठी रेल्वे तिकीट आरक्षण खिडकीप्रमाणेच मोबाईल एप हा एक अत्यंत जवळचा पर्याय मानला जातोय. यासाठी तुम्हाला आयआरसीटीसी मोबाईल एपच्या माध्यमातून तिकीट आरक्षण हा विनाकटकटीचा मार्ग समजला जातो

आयआरसीटीसी मोबाईल एपसाठी लिंक-
 https://play.google.com/store/apps/details?id=cris.org.in.prs.ima&hl=en_IN&gl=US

Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.