सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या गॅरेज हॉटेलची प्रचंड चर्चा !

ह़ॉटेल म्हणजे नीटनेटकेपणा आणि गॅरेज म्हणजे कळकटपणा.. पण गॅरेजमध्येच कोणी छान रुचकर भोजनानंद देणारे मस्त हॉटेल सुरु केलं तर?

होय, हाच प्रयोग सुरु झालाय आणि खवैय्यांच्याही पसंतीला येतोय. विशेष म्हणजे ही गॅरेजवाली कन्सेप्ट पुण्यामुंबईत नाही तर चक्क सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु झालीय. कणकवलीच्या अनिकेत गुरवच्या या हटके फुड कोर्टची सध्या सगळ्याकडे जोरात चर्चा आहे..

आपण सगळेजण सध्या सोशल मिडीयाच्या पिढीत जगतोय. म्हणजे जेवणाचे युट्युब चॅनल जास्त चर्चेत असते आणि जेवणाआधी फुड फोटोग्राफी करुन सोशल मिडीयावर पोस्ट करणे हे शास्त्र असते.. सेल्फी आणि डेकोरेझम ही आजच्या पिढीची आजच्या जगण्यातील मोठी गरज असते. मुंबई गोवा महागार्गावरील कणकवली मधील वागदे गावात नव्या चौपदरीकरणाच्या बाजूला एक छोटेसे गॅरेज आहे. आणि हेच हॉटेल सध्या पर्यटकांचे सेल्फीसाठी हॉट डेस्टिनेशन ठरतय.

एनएच66 फु़ड गॅरेज या नावाच्या या थीम रेस्टॉरामध्ये वेगळेपण प्रत्येक टप्प्यावर जपलं गेलेय, डोळे उघडून पहावं तर फक्त गॅरेज दिसावं आणि डोळे मिटावं तर जेवणाचा आस्वाद घ्यावा आणि याच वेगळेपणाची पर्यटकांना भुरळ पडतेय. मुंबई गोवा महामार्गावर आर्यादुर्गा मंदिर रोडवर वागदे कणकवलीमध्ये एन एच66 फुड गॅरेज हे हॉटेल प्रथमदर्शनीच त्याच्या वेगळेपणाची ओळख करुन देते.
 लांब रस्त्यावरुन पाहिलं तर  अगदी ट्रकचे गॅरेज असते अगदी तसाच हॉटेलचा लूक दिसतो. चिऱ्याचे पांरपारीक कुडकी बांधकाम (उभ्या चिरे सिमेंटच्या सहाय्याने रचणे ) असलेली ट्रक गॅरेजसारखी रचनाच त्याच्या वेगळेपणाची जाणीव करुन देते

हॉटेलमध्ये प्रवेश केल्यावर अगदी सुरुवातीला एक सहा सीटर दिसते. पण ती वास्तवात सहा सीटर नसून तर तो चक्क कॅश काऊंटर आहे.. त्यानंतर वॉकींग स्पेससाठी चक्क हायवे लूक देण्यात आलाय. जसजसे पुढे जाऊ तसंतसे प्रत्येक टेबलावरचे वेगळेपण जाणवते.. अगदी सुरुवातीला जुनी चेतक स्कुटरचे रुपांतर केलेले डायनिंग टेबल रुपांतर केलेले टेबल दिसतेय. 


या फुड कोर्टमधील जी बैठक व्यवस्थाही हटके आहे. पेट्रोल डिझेलचे बॅरेल कापून त्यांना सुर्चीचा लूक देण्यात आला आहे, विशेष म्हणजे सीटींग कम्फर्ट झोन हा अत्यंत आरामदायी आहे. याच बॅरेलचा वापर करुन काही ठिकाणी डायनिगं टेबलही करण्यात आलीय. 

प्रत्येक टेबलला नंबरिगही हटके करण्यात आलय. म्हणजे एक नंबर टेबल, दोन नंबर टेबल असे नंबरींग न करता आरटीओच्या धर्तीवर एम एच पासींग देण्यात आले आहे. वॉश बेसिनसाठी टायरचा वापर असो किंवा पाण्यासाठी पेट्रोल पंपावरील पेट्रोल हँडलचाही वापर अभिनव पद्धतीने करण्यात आलाय. रिक्षा, स्कुटर, कार अशा युनिक पद्धतीने मांडून यांची बैठक व्यवस्था सजवण्यात आलीय.. तर भिंतीवरही टायरचा वापर करण्यात आलाय. इंटेरियर असो मेनू कार्डची सजावट सगळीकडे गॅरेज लूक कायम आहे

हटकेपणाला निमित्त ठरलं लॉकडाऊन

अनिकेत गुरवच्या या थीम हॉटेलची आता पर्यटकांनाही भुरळ वाटतंय. अनिकेत हॉटेल मॅनेजमेंटचा  शिक्षण घेतलेला विद्यार्थी, त्यानंतर तो बेहरिनला कामानिमित्त शिकत गेला. मुंबई गोवा दरम्यान शिपिंग सर्व्हिसला त्याने पंचतारांकित क्रूझवर काम केलंय. मात्र लॉकडाऊनमध्ये सगळं अर्थकारण ठप्प झालं आणि अनिकेत आपल्या मूळ गावी कणकवलीत परतला. ठप्प बाजरपेठेतही धडपड्या अनिकेतला वेगळेपण स्वस्थ बसू देत नव्हते. घरच्यांना आणि आपल्या मित्रांना घेऊन पारंपारिक हॉटेल व्यवसायाला एक वेगळेपणाची जोड दिली. आणि आकाराला आलं, 'एनएच66 फु़ड गॅरेज' !

एनएच66 फु़ड गॅरेजमध्ये आज केवळ मालवणीच नाही तर पंजाबी चायनीज आणि हायवे वरच्या पर्यटकांना जे जे अपेक्षित असते ते सगळं काही उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. खास पर्यटकांसाठी असलेल्या या हॉटेलला आता जिल्ह्यातून खवय्यांची सहकुटुंब उपस्थितीही लक्षणीय असते. 

तुम्हीही पर्यटक असाल किंवा खवय्ये असाल तर कणकवली वागदेच्या 'एनएच66 फु़ड गॅरेज' या हॉटेलला आठवणीने भेट द्या.. तुमच्या खाण्याच्या निमित्ताने झालेली भेट लॉकडाऊनमध्ये एक वेगळेपण घेऊन उभे राहिलेल्या उद्योजकांला नवी ताकद देऊन जाईल !

हॉटेल - एनएच66 फु़ड गॅरेज , वागदे - कणकवली
जेवण प्रकार - cafe and multi-cuisine, continental, indian, punjabi, tandoori, chinese and 'malvani' (व्हेज नॉनव्हेज आणि स्नॅक्स)
स्पेशालिटी - सेल्फी पॉईंट, हटके लूक (upcoming Orientel food)
संपर्क - अनिकेत गुरव : +91 8169431185

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.