सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सायकल बॅंकेबद्दल ऐकलंय का ?


सायकल बँक संकल्पना

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा हा ७०% ग्रामीण क्षेत्र आहे. तालुका हायस्कूल, माध्यमिक हायस्कूलमध्ये आठवी-दहावी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात. शाळेतील २५ ते ३०%विद्यार्थी बसने येत असतात. ग्रामीण भाग त्यात ठरावीक बस असल्याने वेळेच्या आधी व शाळा सुटल्यावर उशिरा घरी जावे लागते. पुण्यानंतर कोकणात सायकल चालवणारे तुलनेने जास्त आहेत. 

हाच विचार मनाशी घेऊन एक अभिनव संकल्पना समोर आली. आणि याकामी मानव साधन विकास संस्थानच्या अध्यक्षा मा. सौ.उमा सुरेश प्रभु यांनी पुढाकार घेतला.आठवी ते दहावीच्या मुलींना सायकल द्यायची. ज्या मुली शाळेला तीन ते चार किमी वरुन येतात त्यांना द्यायची. दहावी झाली की सायकल परत शाळेत आणून द्यायची.  परत ती सायकल दुसऱ्या गरजु मुलीला देता येईल. 

मुलीनांच का ?

मुलगी शाळेत वेळेत जाऊ शकते व घरी येऊ शकते. त्यामुळे मुलीच्या आईला असणारी काळजी थोडी फार कमी होईल. आठवी ते दहावीच्या मुलींमध्ये शारिरिक परिवर्तन होत असते. सायकल चालवल्याने व्यायाम होतो त्यामुळे शारिरिक स्वास्थ्य मिळते. 

सायकल शाळेकडे परत का द्यायची?

चांगली सायकल व्यवस्थित वापरली तर पंधरा ते वीस वर्ष चालते. मुली दहावी नंतर पुढील शिक्षणासाठी शहरात येतात मग सायकल अडगळीत पडते तसे न होता परत सायकल वापरात येऊ शकते. 

काय आहे सायकल बँक

बँकेत ठेवलेली ठेव वापरात येते व व्याजाने वाढत राहते. तशीच सायकल बँक म्हणून दहावी नंतर सायकल बँकेत. मग सायकल मध्ये वाढ कशी होणार. मा.सुरेश प्रभुनी २५० शाळेत दहा सायकल शाळेच्या बँकेत फिक्स डिपॉझिट केल्या आहेत. सामाजिक जाणीवेतून बँक आपण चालवली पाहिजे. माझ्याकडील वापरात नसलेली सायकल सुस्थितीत शाळेत देऊ शकतो. परिवारातील एक वाढदिवस सायकल देऊन साजरा करु शकतो. शिक्षक निवृत्त होताना भेट म्हणुन सायकल द्यावी. दहावी नंतर शाळेला निरोप देताना माजी विद्यार्थीची सायकल देऊ शकतो. आपण ठरवले तर प्रत्येक मुलाला सायकल उपलब्ध होऊ शकते. आपण सर्व जण सायकल बँकेचे खातेदार होऊया.

एक दिवस सायकलचा...
शाळेचा, गावाचा एक दिवस सायकलचा उपक्रम राबवून सर्वजण गावात फिरताना एक दिवस सायकल डे संकल्पना करू शकतो. पर्यावरण संतुलनासाठी आपण सहाय्य करु शकतो. मा.सुरेश प्रभुंनी २५० ई सायकल (बँटरीवर चालणारी) ५०० सायकल गरजु महिलांना, मुंजाळ फाउंडेशन कडून व २०००सायकल शालेय विद्यार्थीनींना गोवा व पुणे विमानतळ प्राधिकरणाकडून उपलब्ध करुन दिल्या आहेत. 

मा.सुरेश प्रभुंची सायकल बँक

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात मानव साधन विकास संस्था अंतर्गत परिवर्तन केंद्र नियोजित जनशिक्षण संस्था सिंधुदुर्ग,गोवा व  पुणे विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार सायकल सायकल बँक अंतर्गत २५० शाळांना सुपूर्त करण्यात आल्या.

सायकल बँक उपक्रमात सहभागी व्हायचे असल्यास जनशिक्षण संस्था, सिंधुदुर्गशी तुम्हीही संपर्क करू शकता

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.